महाडमध्ये चवदार तळे सत्याग्रहाचा ९७ वा वर्धापनदिन उत्सहाने संपन्न चवदार तळ्यावर लाखोच्या संख्येने लोटला भिमसागर….
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
महाड :- महाड येथील चवदार तळ्याचा ९७ वा सत्याग्रह स्मृतिदिन आज दि.२० मार्च रोजी उत्सहात साजरा झाला. याकरिता देशासह संपूर्ण राज्यातून लाखो भीमसैनिक रायगड येथील महाडमध्ये दाखल झाले होते. यां क्रांती दिनाच्या निमित्ताने आलेल्या भीमसैनिकांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना मनुवाद निर्माण होत असून त्याला हद्दपार करायचे असेल तर एकत्र यावे असे आवाहन केले.ते क्रांतीस्तभ मैदानावर बौध्दजन पंचायत समितीने आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी बोलत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सण 19/20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी सामाजिक क्रांती केली या सामाजिक क्रांतीची नोंद जागतिक पाटलावर झाले गेली अनेक वर्ष चवदार तळे स्मृती दिनाच्या वर्धापन दिन महाडमध्ये साजरा केला जात आहे.चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिनासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मोठया प्रमाणावर दाखल झाले होते विविध संघटनानी काढलेल्या मिरवणूका आणि भीम ज्योतीने संपूर्ण चवदार तळे भीम जय घोषाने दुमदुमून गेले आलेल्या भीमसैनिकानी आंबेडकर अनुयायांनी चवदार तळ्याचे पाणी ओजलीत घेऊन प्राशन केले. शाहीर जळसा आणि आंबेडकर गीतांनी चवदार तळ्यावर चैतन्य निर्माण झाले होते.
यावेळी बौध्दजन पंचायत समिती भारिप बहुजन महासंघ पीपल्स रिपब्लिकन पार्टी रिपब्लिकन पार्टी संघटना भारत मुक्ती मोर्चा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आदी विविध संघटना,धार्मिक संघटना, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षाच्या वतीने सभा आणि मिरवणुकीचे आयोजन केले जाते.चवदार तळे येथे आज पहाटेपासूनच भीमसैनिकांनी अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी केली होती. सकाळी 9:00 वाजता शासनाच्या वतीने पोलीस मानवंदना देखील करण्यात आले महाड, माणगांव पोलादपूरचे आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्तेजित बडे,उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा वानापुरे, महेश शितोळे, महाड पोलीस उपविभागीय अधिकारी काले आधी सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावर्षी आचारसंहिता असल्याने राजकीय बॅनरबाजी मात्र झाली नसली तरी काही ठिकाणी कमाने दिसून येत होत्या महाड नगर परीषदेने सालाबाद प्रमाणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आंबेडकरी अनुयांयासाठी मंडप तर अनेक सामाजिक संस्थांनी भोजन आणि पिण्याच्या व्यवस्था केली होती त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनच्या वतीने चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महाड शहराच्या बाहेर मोकळ्या जागेत वाहन पार्किंग सुविधा केल्यामुळे शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर काही अशी कमी झाली. महाड मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे देखील शासनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी शायरी कार्यक्रम आणि आंबेडकरी गीताचा आनंद घेता आला.