बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या १५ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे निवड

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या १५ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे निवड

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या १५ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे निवड

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या १५ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे निवड

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 21 मार्च
बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेलच्या वतीने दिनांक २७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हू मध्ये विविध डिप्लोमा इन इंजिनियर च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यात Dhoot Transmission Ltd., संभाजीनगर या कंपनी मध्ये बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या विविध विभागातील १५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तसे नियुक्ती पत्र संस्थेला नुकतेच प्राप्त झाले आहे. या १५ विद्यार्थ्यांमध्ये मेकॅनिकल विभागाचे ६, ईलेक्ट्रीकॅल विभागाचे ८ आणि इलेक्ट्रोनिक्स अंड टेलीकॅमूनीकेशन च्या १ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या प्लेसमेंटमध्ये सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वोदय महिला मंडळाच्या अध्यक्षा नील सी. बजाज , सचिव ममता बजाज, संस्थेचे मुख्य कार्यपालन अधिकारी भरत बजाज, बजाज तंत्रनिकेतनचे प्राचार्य सतीश ठोंबरे यांनी अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ट्रेनिंग अंड प्लेसमेंट ऑफिसर एम. एम. डांगे , मेकॅनिकॅल विभागाचे विभाग प्रमुख एल. एस. मद्दीवार, ईलेक्ट्रीकॅल विभागाचे विभाग प्रमुख जि. डी. मिटकर, आणि इलेक्ट्रोनिक्स अंड टेलीकॅमूनीकेशन विभागाच्या विभाग प्रमुख स्वाती चौधरी तसेच सोहेल शेख यांनी अथक परिश्रम घेतले.