दुय्यम निबंधक कार्यालय शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी ही राहणार सुरू
ज्ञानेश्वर तूपसुंदर
नाशिक तालुका प्रतिनिधी
मो. 8668413946
नाशिक :- दरवर्षी शासनाकडून एक एप्रिल रोजी नवीन बाजार मूल्य दर तक्ते प्रसिद्ध केले जाते, त्यामुळे दरवर्षी बाजार मूल्यांमध्ये काही प्रमाणात वाढ होते, त्या अनुषंगाने मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटीमध्येही वाढ होते, त्याचा बोजा नागरिकांवर पडत असतो मागील दोन वर्षापासून बाजार मूल्यात वाढ न झाल्यामुळे ह्या वर्षी वाढ होण्याची शक्यता जास्त आहे.
त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये, त्यासाठी शासनाने मार्च महिन्यात दि. २३ व २४ मार्च तसेच २९ ते ३१ मार्च रोजी शासकीय सुट्टी जाहीर केलेली आहे.
नागरिकांना मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी अडचण निर्माण होऊ नये, म्हणून सुट्टीच्या दिवशीही दस्त नोंदणी कार्यालय सुरू राहील, असे मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी सांगितले.