अवैध रेती तस्करीचे दोन ट्रॅक्टर जप्त

अवैध रेती तस्करीचे दोन ट्रॅक्टर जप्त

अवैध रेती तस्करीचे दोन ट्रॅक्टर जप्त

अवैध रेती तस्करीचे दोन ट्रॅक्टर जप्त
🖋️ साहिल सैय्यद….
घुग्घुस तालुका प्रतिनिधि..
📲 9307948197

घुग्घुस: घुग्घुस येथून जवळच असलेल्या पांढरकवडा-शेणगाव रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून अवैध रेती तस्करी करतांना जप्त केले.

सहायक पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे व पोलीस पेट्रोलिंग करत असतांना वढा नदीच्या घाटातून अवैधरित्या रेती तस्करी करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

पोलिसांनी पांढरकवडा-शेणगाव रस्त्यावर सापळा रचून अवैध रेती तस्करी करतांना महिंद्रा कंपनीचे दोन ट्रॅक्टर प्रत्येकी एक ब्रास रेती किंमत २० हजार रुपये व ट्रॅक्टर ट्राली किंमत १० लाख रुपये असा एकूण १० लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नंदकिशोर नामदेव आत्राम (२५) व प्रशांत यशवंत उपरे (४३) दोन्ही रा. शेणगाव यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.

ही कारवाई ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे, गुन्हे पथकाचे प्रकाश करमे, महेंद्र भुजाडे, महेंद्र वन्नकवार, मनोज धकाते, अनिल बैठा, महेश भोयर, विजय ढपकस, नितीन मराठे यांनी केली.

पुढील तपास प्रकाश करमे करीत आहे.