सन्माननीय विलासजी गोरेगावकर यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहिर.
नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
८९८३२४८०४८
माणगाव: सन्माननीय विलासजी गोरेगावकर यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दिनांक २८ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन मिडियावार्ता न्युज प्रसिद्ध मराठी दैनिक वृत्तपत्र यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सोहळ्याचे आयोजन सांताक्रुझ पूर्व (वाकोला) येथे करण्यात येणार आहे, या पुरस्कार सोहळ्यात, रायगड जिल्हा,माणगाव तालुक्यातील गोरेगांवचे सुपुत्र, गोरेगांव जन्मभूमी तसेच मुंबई कर्मभूमी असणारे . सन्माननीय विलासजी लक्ष्मण गोरेगावकर हे गेली १८ वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत राष्ट्रीय चर्मकार संघामध्ये मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत, राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.माणुसकीची शाळा या संस्थेत सदस्य असून या संस्थे मार्फत गेली ४ वर्ष संविधान जनजागृती अभियान राबवित आहेत, कशाचीही तमा न बाळगता त्यांचा हा समाजकार्याचा प्रवास चालूच आहे,त्यांची समाजाबद्दल असणारी तळमळ तसेच पूर्ण महाराष्ट्रभर फिरून अगदी स्वखर्चाने प्रवास करीत समाज प्रबोधनात्मक कार्याचा प्रवास दिवसेंदिवस अधिक जोमाने महाराष्ट्र राज्यभर अविस्मरणीय चालू आहे, त्यांच्या या कार्याला मीडियावार्ता न्युज मराठी वृत्तपत्राचा सलाम.
मा.विलासजी लक्ष्मण गोरेगावकर यांच्या या कार्याची दखल घेवून मीडियावार्ता न्युज मराठी वृत्तपत्र यांच्या तर्फे मा. विलास लक्ष्मण गोरेगावकर यांना” समाज सेवक” पुरस्कार बहाल करून सन्मानित करण्यात येणार आहे.