जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 प्रमाणे बंदी आदेश जारी

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 प्रमाणे बंदी आदेश जारी

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 प्रमाणे बंदी आदेश जारी

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दि.१६ मार्च रोजी कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमानुसार ३२-रायगड लोकसभा मतदार संघामध्ये दि.०७ मे २०२४ रोजी व ३३-मावळ लोकसभा मतदार संघामध्ये दि.१३ मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.सदर निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता अमलात राहणार असून, निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पाडणे तसेच मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येणे आवश्यक आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्षाचे पुरस्कृत उमेदवार प्रभागामध्ये पक्षाचा प्रभाव वाढविण्यासाठी पत्राद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधून जास्तीत जास्त मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करीत असतात.

जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ नुसार त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पाडावे, मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र मिळावे व आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व शस्त्र परवाना धारकांना शस्त्र बाळगण्यास व बरोबर घेवून फिरण्यास, मतदान केंद्राच्या १०० मी. परिसरात मंडपे, दुकाने उभारणे, मोबाईल, स्मार्ट फोन, पेजर, वायरप्लेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर कोणतेही संदेशवाहक यंत्र बाळगणे तसेच निवडणूकीच्या कामा व्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडेल असे कोणतेही कृत्त्य करण्यास अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.हा मनाई आदेश रायगड जिल्ह्याच्या हद्दीत ३२-रायगड व ३३-मावळ लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रातील हद्दीत दि.०७ मे २०२४ व दि.१३ मे २०२४ रोजी मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील.हा मनाई आदेश घरोघरी जाऊन निवडणूकीसंबंधी दौरा (Visit) करणे, लग्न सोहळा, अंत्ययात्रा, धार्मिक विधी, सामाजिक सण व रुढी परंपरेने होणारे विधी इ. बाबींकरीता लागू होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here