घुग्घुस येथे आचारसंहिता स्थिर निगराणी पथक

घुग्घुस येथे आचारसंहिता स्थिर निगराणी पथक

घुग्घुस येथे आचारसंहिता स्थिर निगराणी पथक
🖋️ साहिल सैय्यद….
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197

घुग्घुस : घुग्घुस : येथील घुग्घुस-वणी मार्गावरील बेलोरा नदीच्या पुलाजवळ आचारसंहिता स्थिर निगराणी पथक तैनात करण्यात आले आहे.

आगामी लोकसभा सार्वत्रीक निवडणुक-२०२४ आणि १३-चंद्रपूर लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर १८ मार्चपासून आचारसंहिता स्थिर निगराणी पथक तैनात करण्यात आले असून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

पथकाच्या ठिकाणी २ सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून एकूण ४ पथकाद्वारे पाळीने निगराणी ठेवण्यात येत आहे.

आतापर्यंत अवैध रोकड किंवा साहित्य मिळाले नसल्याचे तपासणी अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा पथक प्रमुख एल. के. राठोड, ग्रामसेवक राजेश तुरे, वाहतूक पोलीस राहुल मसाडे, निलेश तुमसरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here