रोटरी क्लब आँफ मुंबई तर्फे रा. जि. प. उमरोली/खरवली शाळेला ७५ हजार रुपयांचा निधी शाळा अद्यावत व अत्याधुनिकरणावर भर......

रोटरी क्लब आँफ मुंबई तर्फे रा. जि. प. उमरोली/खरवली शाळेला ७५ हजार रुपयांचा निधी शाळा अद्यावत व अत्याधुनिकरणावर भर……

रोटरी क्लब आँफ मुंबई तर्फे रा. जि. प. उमरोली/खरवली शाळेला ७५ हजार रुपयांचा निधी शाळा अद्यावत व अत्याधुनिकरणावर भर......

✍️राम भोस्तेकर ✍️
पन्हळघर विभाग प्रतिनिधी
📞92737 01068📞

माणगांव :-रोटरी क्लब आँफ मुंबई सेंट्रलच्या सहकार्याने क्लबच्या माजी अध्यक्षा काजल थडानी, संचालक व माणगांव तालुक्यातील मौजे शिरवली गावचे सुपुत्र दत्ताराम पांडुरंग शिंदे यांच्या माध्यमातून माणगांव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद उमरोली/खरवली शाळेला अद्यावत व अत्याधुनिक करण्यासाठी ७५ हजार रुपयांचा निधी देण्यात आला. यामध्ये शाळेसमोरील पटांगण भराव करणे, किचन शेड, अद्यावत करणे, मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर, मोठे कपाट, खेळाचे साहित्य यासाठी हा निधी वापरण्यात आला. यावेळी रोटरी क्लब मुंबई माजी अध्यक्षा काजल थडानी, संचालक दत्ताराम शिंदे, कमिटी अध्यक्ष मंगेश मोरे, उपाध्यक्षा वैदही सत्वे, मुख्याध्यापक महेश गोसावी, शिक्षिका नीता काळोखे, साक्षी तुपे, निर्मला जाधव, विष्णू भवाळ, मनोज बात्रे, विनिता जाधव, सविता ढेपे, महादेव सत्वे, मिनाक्षी मोरे आदी उपस्थित होते.

रोटरी क्लब आँफ मुंबई सेंट्रलचे सन्मानिय पदाधिकारी काजल थडानी व दत्ताराम शिंदे यांनी शाळेत जाऊन मुलांच्या सुविधा करिता काही साधने उपलब्ध करून देता येतील याबाबत
आढावा घेतला होता. रोटरी क्लब ही संस्था महानगरी मुंबई शहरात कार्यरत आहे. क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन दत्ताराम पांडुरंग शिंदे हे माणगांव तालुक्यातील मौजे शिरवली गावचे रहिवाशी आहेत. ग्रामीण भागात शैक्षणिक व सरकारी रुग्णालयात आवश्यक असणारी साधन व्यवस्थांची त्यांना चांगली माहिती होती. या संस्थेच्या माध्यमातून ते आपल्या मातृभूमी असलेल्या तालुक्यातील सर्वसामान्य लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम हाती घेवुन क्लबच्या सहकार्याने सेवाभावी काम करीत आहेत.तसेच तालुक्यातील वडघर मुद्रे, नांदवी, कुशेडे, कुमशेत, ढालघर, निळगूण आदिवासीवाडी, हरकोल बौद्धवाडी, नांदवी आदिवासी वाडी या शाळांना आँनलाईन शिक्षणाकरिता ई-लर्निंग किट दिले आहेत . तसेच पन्हळघर बुद्रुक येथील आदिवासीवाडी वरील रमेश घोग्रेकर या आदिवासी बांधवाला घर दुरुस्तीसाठी ५०००० रु. देण्यात आले होते. त्याचे घर पूर्ण झाले असून रोटरी क्लब मुंबईच्या पदाधिकाऱ्यांचे हस्ते उदघाटन देखील करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here