विदर्भातील पहिल्याच ग्रामपंचायत निवडणूक निकालात वंचित आघाडीने मारली बाजी.

अकोला :- महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. विदर्भातील पहिला निकाल हाती आला असून वंचित बहुनज आघाडीने आपलं खातं उघडलं आहे. अकोल्यातील सांगवी खुर्द ग्रामपंचायतीत वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने राज्यभरातील विविध भागांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही वंचित आघाडीने विजयी घोडदौड सुरू केल्याचं दिसत आहे. त्यामुळे आणखी किती ग्रामपंचायतींमध्ये वंचितकडून विजयी फडकावली जाते, हे पाहावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here