तमनाथ आडिवली मध्ये उल्हास नदीत उत्खनन… प्रोकलेम मशीनचे सहायक नदीचे खोलीकरण… पुर नियंत्रण रेषेच्या सर्व नियम धाब्यावर

तमनाथ आडिवली मध्ये उल्हास नदीत उत्खनन... प्रोकलेम मशीनचे सहायक नदीचे खोलीकरण... पुर नियंत्रण रेषेच्या सर्व नियम धाब्यावर

तमनाथ आडिवली मध्ये उल्हास नदीत उत्खनन…

प्रोकलेम मशीनचे सहायक नदीचे खोलीकरण…
पुर नियंत्रण रेषेच्या सर्व नियम धाब्यावर

तमनाथ आडिवली मध्ये उल्हास नदीत उत्खनन... प्रोकलेम मशीनचे सहायक नदीचे खोलीकरण... पुर नियंत्रण रेषेच्या सर्व नियम धाब्यावर

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333

कर्जत :- खंडाळा घाटात उगम पावलेली उल्हास नदी ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजली जाते.या नदीच्या आसपास कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये असे स्पष्ट निर्देश मुंबई हायकोर्ट यांचे आहेत.मात्र तरी देखील नदीमध्ये मातीचे उत्खनन आणि नदीमध्ये असलेली बेट नष्ट करण्याचा धडाका आडीवली तमनाथ भागात सुरू आहे.दरम्यान,राजकीय वरदहस्त असलेले तेथील बांधकाम दिवसेंदिवस अधिक वेगाने सुरू असून अधिकारी कागदी घोडे नाचवत आहेत.

कोंदिवडे कर्जत रस्त्याच्या कडेने वाहणारी उल्हास नदी ठाणे जिल्ह्यासाठी जीवनवाहिनी समजली जाते.या नदीच्या परिसरात कोणत्याही प्रकारची बांधकामे होणार नाहीत याची काळजी स्थानिक प्रशासनाने घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.मात्र असे असताना थेट पूर नियंत्रण रेषेमध्ये जावून बांधकाम आणि उत्खनन दररोज सुरू असून राजकीय वरदहस्ताने सुरू असलेले नदी पात्रातील बांधकाम कोण थांबविणार? असा प्रश्न सर्वसामान्य यांना पडला आहे.तमनाथ आणि आडीवली या भागात सुरू असलेले बांधकाम यामुळे नदीच्या पलीकडे असलेल्या गावांमध्ये पावसाळ्यात पाणी शिरणार आहे.मोहीली परिसरातील बहुसंख्य भागात पाणी शिरून नुकसान होणार असून पूर्वी 150 मीटर रुंदीचे नदीचे पात्र आज फक्त 50 मीटर रुंदीवर येवून ठेपले आहे.त्यामुळे पावसाळ्यात खऱ्या अर्थाने नदीच्या पलीकडे असलेल्या भागातील रहिवाशी यांची धावपळ आणि त्यांच्यासाठी रेस्कु करण्याची वेळ प्रशासनावर येणार हे जवळपास नक्की आहे.
आता तर नदीच्या पात्रात घुसून संबंधित बांधकाम व्यवसायिक कडून मातीचे उत्खनन करून गाळ काढला जात आहे.त्या परिसरात गेली आठ दिवस प्रोकलेम मशीन चे साहाय्याने नदी मधून माती काढून बांधकाम केलेल्या ठिकाणी भराव टाकला जात आहे.त्यामुळे जुन्या नदी पात्राचे अवशेष मिटवून टाकण्याचा प्रयत्न संबंधित बांधकाम व्यवसायिक करीत आहेत.दुसरीकडे गाळ भरलेली माती काढून नदीमध्ये अतिक्रमण करण्याचा डाव संबंधित बांधकाम व्यवसायिक आणि जागा मालक यांचा दिसून येत आहे.त्याचवेळी नदी मध्ये वर्षानुवर्षे असलेले बेट ही देखील उध्वस्त केली जात आहेत.त्यासाठी अवजड मशीन यांचे साहाय्याने ती बेटे नष्ट करून तेथे बोटिंग क्लब उभारण्यासाठी तयारी पूर्ण केली जात आहे.त्यामुळे ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली नदी मध्ये प्रदूषण करण्याचा प्रयत्न भविष्यात या ठिकाणी होणार आहे.स्वामित्व शुल्क आणि मार्च अखेर या काळात महसूल विभागाचे तलाठी आणि मंडळ अधिकारी कुठे खोदकाम सुरू आहे,याचा शोध घेत असतात.मात्र मुख्य रस्त्याच्या कडेला रात्रंदिवस प्रोक्लेम मशीन यांचे सहाय्याने नदी मध्ये घुसून माती काढून अन्य ठिकाणी टाकली जात असताना महसूल विभाग तेथे कारवाई करून आपला महसूल वाढविण्यासाठी आग्रही नाही याचे गणित देखील सर्वसामान्य लोकांच्या कळण्याच्या पलीकडील आहे.
राजकीय वरदहस्त यामुळे उल्हास नदी मध्ये सुरू असलेले बांधकाम आणि नदी पात्रात माती काढण्याचे सुरू असलेले उत्खनन याबाबत प्रशासनाची भूमिका प्रचंड संशयास्पद आहे.नदी मधून पाणी उचलून शेती करण्याचा प्रयत्न केला तरी पाटबंधारे विभाग कारवाई करायला पुढे येत असल्याची असंख्य उदाहरणे स्थानिक गरीब शेतकऱ्यांच्या वाट्याला आली आहेत.मात्र राजकीय आशीर्वादाने सुरू असलेली बांधकाम आणि माती उत्खनन प्रशासनाला दिसत नाहीत याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.