लोकशाहीचा निवडणुकीचा उत्सव कार्यक्षम रीतीने व प्रभावीपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे तहसीलदार स्वाती पाटील तळा येथे स्विप पथक अंतर्गत मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन.

लोकशाहीचा निवडणुकीचा उत्सव कार्यक्षम रीतीने व प्रभावीपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे तहसीलदार स्वाती पाटील तळा येथे स्विप पथक अंतर्गत मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन.

लोकशाहीचा निवडणुकीचा उत्सव कार्यक्षम रीतीने व प्रभावीपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे तहसीलदार स्वाती पाटील

तळा येथे स्विप पथक अंतर्गत मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन.

लोकशाहीचा निवडणुकीचा उत्सव कार्यक्षम रीतीने व प्रभावीपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे तहसीलदार स्वाती पाटील तळा येथे स्विप पथक अंतर्गत मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन.

किशोर पितळे-तळा तालुका प्रतिनिधी
९०२८५५८५२९ 

तळा :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता जास्तीत जास्त लोकांनी नैतिकदृष्ट्या मतदान करण्यास प्रवृत्त व्हावे यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देश पातळीवर स्वीप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या स्वीप कार्यक्रमांतर्गत तळा तालुक्यामध्ये ही स्वीप पथक स्थापन करण्यात आले आहे. या लोकशाहीचा निवडणुकीचा उत्सव कार्यक्षम रीतीने व प्रभावीपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन तहसीलदार स्वाती पाटीलयांनी केले.या स्वीप पथकाच्या नूडल ऑफिसर म्हणून श्रीमती दिपाली ह. शेळके पर्यवेक्षक,एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय तळा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकामध्ये द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा येथील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ राजाराम महादेव थोरात, डॉ .दिवाकर धोंडू कदम तसेच जी. एम. वेदक कॉलेज ऑफ सायन्स तळा येथील डॉ. सचिन बंगाळे, डॉ. नसरीन बानो शेख यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत तळा तालुका परिसरात मतदार जनजागृती करण्यासाठी नियोजन आराखडा तयार करून स्वीप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तळा तहसीलदार श्रीमती स्वाती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तळा तहसील कार्यालयात वेळोवेळी सहविचार सभांचे आयोजन करून नियोजन करण्यात आले आहे.दि २७ मार्च२४  रोजी द .ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय,  कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वीप पथकाच्या माध्यमातून तळा परिसरात मतदार जनजागृती रॅलीच्या आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या प्रारंभी द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा येथील प्रभारी प्राचार्य भगवान लोखंडे यांनी मतदार जनजागृतीची लोकशाहीच्या सशक्तीकरणामधील भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी याप्रती बांधीलकी कायम ठेवावी असे आवाहन केले. याप्रसंगी तळा तहसीलदार श्रीमती स्वाती पाटील यांनी या स्वीप पथकाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना व उपस्थितांना दिली.यावेळी नोडल अधिकारी दिपाली  शेळके यांनी या स्वीप पथकाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.राजाराम थोरात,डॉ.दिवाकर कदम, प्राध्यापक नितीन पाटील,प्राध्यापक डी. टी. आंबेगावे, द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालया तील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. या स्वीप पथकाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या प्रबोधन रॅलीच्या माध्यमातून तळा बाजारपेठ तळानगरपंचायत व तळा मधली आळी या परिसरात घोषणा व रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी तहसीलदार  स्वाती पाटील, निवडणूक नायब तहसीलदार जितेंद्र टेंबे,चंद्रकांत राऊतमंडलअधिकारी(सोनसडे),किशोर मालुसरे (तलाठी तळा), भारत जाधव (निवडणूक लिपिक), अनिल घोडे (तलाठी),  रवी बावदाने (शिपाई ), प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.