होळी सणाचे अवचैत्य साधून नवयुग क्रिकेट संघ पुरार आयोजित एकदिवसीय भव्यदिव क्रिकेट स्पर्धा संपन्न

होळी सणाचे अवचैत्य साधून नवयुग क्रिकेट संघ पुरार आयोजित एकदिवसीय भव्यदिव क्रिकेट स्पर्धा संपन्न

होळी सणाचे अवचैत्य साधून नवयुग क्रिकेट संघ पुरार आयोजित एकदिवसीय भव्यदिव क्रिकेट स्पर्धा संपन्न

होळी सणाचे अवचैत्य साधून नवयुग क्रिकेट संघ पुरार आयोजित एकदिवसीय भव्यदिव क्रिकेट स्पर्धा संपन्न

✍️-नितेश पुरारकर✍️
गोरेगाव लोणेरे विभाग प्रतिनिधी.
📞संपर्क-७०२११५८४६०.

पुरार गोरेगाव :-होळी सणाचे अवचित्य साधून नवयुग क्रिकेट संघ पुरार यांच्या माध्यमातून मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते.सुंदर खेळपट्टी तसेच देखण्यास्वरूपाचे मैदान व नियोजनबद्ध आयोजन व नियोजन करण्यात होते. कुणबी समाज बावीशी विभागातून सर्व नामांकित १६ संघांनी सहभाग घेतला होता.सर्व संघांनी अथक प्रयत्न केले.परंतु काही संघांना विजय तर काही संघांना पराजय स्वीकारावा लागला. अशातच अथक मेहनत व संपूर्ण संघाच्या एकजुटीने तसेच विनीत पद्रत यांच्या भेदक व वेगवान गोलंदाजीच्या आधारे श्री दत्तगुरू क्रिकेट संघ केस्तुली ने स्वप्नपूर्ती कामकीरी करत जवळपास पाच वर्षाने प्रथम क्रमांक पटकावला. तर रायगड जिल्ह्यातील नामांकित खेळाडू अजय पांचाळ यांची उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीच्या आधारे यंगस्टार क्रिकेट संघ हरकोल कोंड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.व बावीशी विभागातील नामांकित कुशेडे संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
श्री दत्तगुरू क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज विनीत पद्रत यांस उपांत्य सामन्यात उत्कृष्ट गोलंदाज व संपूर्ण स्पर्धेतील सामनावीर म्हणून चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यंगस्टार क्रिकेट संघ हरकोल कोंड संघाचे अजय पांचाळ यांना उत्कृष्ट फलंदाज म्हणून चषक देऊन सन्मानित करण्यात आले. नवयुग संघ पुरार आयोजित क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण विशेष पाहुणे कुणबी युवा मंच गोरेगाव माणगांव -अध्यक्ष-चेतनजी मोरे तसेच कुणबी समाज बावीशी विभाग -उपाध्यक्ष-चंद्रकांत अग्रे कुशेडे व पुरार चे वरिष्ठ ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले.
संपूर्ण स्पर्धेचे आयोजन कुणबी युवा मंच सह खजिनदार -विलास वाघरे.कुणबी समाज क्रिकेट संघटना गोरेगाव विभाग -माजी कार्याध्यक्ष -ग्रामस्थ मंडळ सेक्रेटरी सुरेश वाघरे.रमेश आंबरकर.संघाचे कर्णधार- राहुल आंबरकर .रामदास धोंडगे.क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष-विनोद वाघरे.सचिव-विश्वनाथ वाघरे. खजिनदार-परेश तुरे.सागर गोठलं तसेच नवयुग क्रिकेट संघ पुरार चे सर्व खेळाडू यांनी केले .संदीप तुरे यांनी संपुर्ण स्पर्धचे समालोचन अगदी शेवट पर्यंत केले व बक्षीस वितरण झाल्यानंतर स्पर्धेची सांगता करण्यात आली.