तुम्हाला आमदार होण्याची घाई झाली असेल तर उतरा रिंगणात… कोण कोणाला हत्तीच्या पायाखाली देतील…

तुम्हाला आमदार होण्याची घाई झाली असेल तर उतरा रिंगणात... कोण कोणाला हत्तीच्या पायाखाली देतील...

तुम्हाला आमदार होण्याची घाई झाली असेल तर उतरा रिंगणात… कोण कोणाला हत्तीच्या पायाखाली देतील…

तुम्हाला आमदार होण्याची घाई झाली असेल तर उतरा रिंगणात... कोण कोणाला हत्तीच्या पायाखाली देतील...

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333

कर्जत;- राज्यात महायुतीचे सरकार असून महायुती मधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांना आमदार होण्याची घाई झाली असेल तर एकदा होऊनच जाऊ दे.. जनता आणि शिवसैनिक दाखवून देईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेत केलेल्या आरोप यांच्याबद्दल उत्तरे देण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद बोलावली होती.या पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी फेब्रुवारी महिन्यात अलिबाग येथील महायुती मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत विधानसभा मतदारसंघ मधील एकही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. तो विषय आम्ही वरिष्ठ स्तरावर सांगितला आहे. काही दिवसांपूर्वी पेण येथील जिल्हा कार्यकारिणी मध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या बद्दल दक्षिण रायगड मधील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.त्या बैठकीत सुनील तटकरे यांच्याकडून आतापर्यंत आलेला अनुभव कार्यकर्त्यांनी सांगितला. त्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत मध्ये आमचा प्रतिस्पर्धी निर्माण करण्याचे काम सुरू आहे.या ठिकाणी एवढा मोठा विकास होत असताना तुमचा जळफळाट होत आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.तुम्ही जाहीरपणे आमदारांवर टीका करता आणि आमच्याकडून तुम्ही युती धर्माची आठवण करून देता हे चुकीचे असून तुम्ही आता भावी म्हणून म्हणता,तुम्ही भावीच राहणार असून विद्यमान आमदार यांनी 25 वर्षे हलणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.सुरेश लाड यांच्यावर विद्यमान आमदार यांच्याकडून टीका झाल्यावर तुम्ही का शांत राहिले आहेत.मात्र सुनील तटकरे यांच्यावर तिका झाल्यावर तुम्ही शाबासकी मिळविण्यासाठी अगदी दुसऱ्या दिवशी पुढाकार घेता हे कितपत योग्य आहे हे तालुक्यातील जनतेला काळात नाही असे वाटते काय असा प्रश्न संतोष भोईर यांनी उपस्थित केला.

सुधाकर घारे यांना महायुती मध्ये एकत्र असताना महायुती असून देखील तुम्हाला आमदार होण्याची घाई झाली असेल तर कोण कोणाला हत्तीच्या पायाखाली चिरडणार हे जनता दाखवून देईल असा इशारा जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी दिला.

कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप यांनी बोलताना महायुती मधील मित्र पक्ष एनसीपी ने आमदार महेंद्र थोरवे यांचे पूर्ण भाषण न ऐकता केवळ एक शब्द घेवून पत्रकार परिषदेत आमदारांवर टीका केली.मात्र आम्ही त्यांचा निषेध तालुका प्रमुख म्हणून करतो. जिल्हा कार्यकारिणी मध्ये दक्षिण रायगड मधील पदाधिकारी यांनी केलेल्या भाषणाला ते प्रतिउत्तर होते. तेथील कार्यकर्त्यांनी केलेले संभाषणाला दिलेले उत्तर होते.तेथे आमदारांनी महायुतीच्या उमेदवार यांचे प्रामाणिक काम देखील करण्याचे आश्वासन दिले होते, त्याबद्दल एनसीपी कडून अवाक्षर केले गेले. खोपोली येथील सुरेखा खेडकर यांच्या पक्ष प्रवेशात आमच्यावर वैयक्तिक तिका करण्याची गरज नाही.मी तालुका प्रमुख असलो तरी 30 वर्षे वेगवेगळ्या पक्षाच्या आमदार यांच्या हाताखाली काम केले,त्यावेळी मी कधीही टोल दिला नाही.करोडोंचा निधी आणून आम्ही आमदार होऊन त्या माध्यमातून विकास साधलेला आहे आणि हे म्हणतात कोणता विकास केला.दुसरीकडे महायुतीचा मेळावा अलिबाग येथे झाला,त्यावेळी त्यांच्या पक्षाचे नेते प्रमुख म्हणून उपस्थित होते, परंतु कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी तेथे आला नाही.त्यामुळे आम्ही काही दुतखुळे नाहीत आणि त्यांना २०२४ ची घाई झाली असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत.या पत्रकार परिषदेत शिवराम बदे,संतोष भोईर यांनी आपली भूमिका मांडली.
यावेळी शिवसेना पक्षाचे उप जिल्हा प्रमुख भाई गायकर,जिल्हा सल्लागार संतोष भोईर,विधानसभा संघटक शिवराम बदे,खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील,महिला आघाडी जिल्हा सल्लागार सुरेखा शितोळे,युवा सेना तालुका प्रमुख अमर मिसाळ,रत्नाकर कोळंबे, सुनील रसाळ,दिलीप ताम्हाणे, रमेश मते,अंकुश शेळके,मिलिंद विरले,आदी मान्यवर उपस्थित होते.