भंडारा गोंदिया जिल्ह्यातील आदर्श पत्रकार मा. भवन लिल्हारे व प्रविण शेंडे छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सन्मानित
माजी आदर्श शिक्षक खुशाल शेंडे व आदर्श पोलीस पाटील श्रीमती सिमा बशिने यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने केले सन्मानित
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा✍️📱मो.नं.9373472847📞
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यालगत असलेल्या मौजा मांडेसर येथील शा.व्य. समितीचे अध्यक्ष, आदर्श पत्रकार मा. भवन लिल्हारे यांना दिनांक २८ मार्च २०२४ रोजी वाकोला वेल्फेअर असोसिएशन सांताकृझ कालीना पूर्व – ०२९ मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने गौरविण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती साजरी करण्यात येत असताना वाकोला वेल्फेअर असोसिएशन येथे दैनिक मिडिया वार्ता न्युज यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यालगत असलेले मौजा मांडेसर येथील आदर्श पत्रकार मा. भवन लिल्हारे व गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील आदर्श पत्रकार मा. प्रविण शेंडे, तथा माजी आदर्श शिक्षक मा. खुशाल शेंडे जि.प. उच्च प्राथमिक शाळा मांडेसर, व आदर्श पोलीस पाटील श्रीमती सिमा रामदयाल बशिने यांना जाहीर होऊन संपादक भागुराम सावंत व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ह्यावेळी त्यांचा मित्र परिवार उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार मिळाल्याने दोन्ही ही आदर्श पत्रकार , माजी आदर्श शिक्षक , आदर्श पोलीस पाटील यांनी समाधान व्यक्त करीत असताना आयोजकांनी व दैनिक मिडिया वार्ता न्युज यांच्या वतीने हा पुरस्कार देऊन आम्हाला सन्मानित केलेत व आमच्या कार्याची दखल घेतलीत तसेच भंडारा जिल्हा प्रतिनिधी मा. भवन लिल्हारे, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी यांनी आम्हाला या पुरस्कारासाठी योग्य समजून आमची निवड केलीत त्या बद्दल माजी आदर्श शिक्षक मा. खुशाल शेंडे,व आदर्श पोलीस पाटील श्रीमती सिमा रामदयाल बशिने यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच हा पुरस्कार देऊन आमची अधिक जबाबदारी वाढली आहे. असे देखील सांगितले.
हा पुरस्कार प्रदान सोहळा यशस्वी होण्यासाठी संपादक भागुराम सावंत व सहसंपादक मनोज खोब्रागडे तसेच महाराष्ट्रातील दैनिक मिडिया वार्ता चे पत्रकार यांनी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संतोष मोरे यांनी केले. तर प्रस्थाविक म्हसळा तालुका प्रतिनिधी संतोष उध्दरकर यांनी मांडले. तसेच आभार कोकण ब्युरो चिप पत्रकार सचिन पवार यांनी माणले. या वेळी आरपीआय चे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे,आरपीआय सरचिटणीस विवेक पवार, टायगर गृप अध्यक्ष संजय खंडागळे, साधु कटके, माधुरी टेकाम, बेटी बचाव बेटी पढाव संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय दुबे, कामगार नेते प्रकाश जाधव, दैनिक मुंबई संपादक दिलशाद खान, तसेच सर्व पुरस्कार धारक, त्यांचे सहकारी, मिडिया वार्ता चे सर्व पत्रकार उपस्थित होते.
या सोहळ्यात अनेक मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच, गोरेगावकर, तांबे व अंगणवाडी सेविका सानिका उध्दरकर यांनी सादर केलेली कविता व कालीन गृप यांनी सादर केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नृत्य,पोवाडा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांचे आकर्षण ठरले, या वेळी मिडिया वार्ता न्युज चे संपादक भागुराम सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दैनिक वृत्तपत्र व दैनिक पोर्टल व्दारे आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो आहोत, आमचे प्रतिनिधी पत्रकारिता असल्याचे भान ठेवून काम करीत असताना समाजातील तळागाळातील जनतेला न्याय देण्यासाठी तत्पर आहेत, तसेच समाजातील जनतेसाठी न्याय हक्कासाठी झटणाऱ्या समाजसुधारक व विविध क्षेत्रातील व्यक्तिंना पुरस्कार देण्याचे भाग्य आमच्या हातुन होत आहे. खरच आम्ही धन्य झालो आहे. असे देखील म्हणाले. व निलेश मांदाडकर व चंद्रकांत पवार यांच्या कामाचे कौतुक करून विषेश अभिनंदन केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. हे खास व संपादक भागुराम सावंत यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी मिडिया वार्ता न्युजचे पत्रकार यांचा देखील आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.