कुणबी समाज गोरेगाव पश्चिम विभाग संघटना क्रिकेट स्पर्धेत नवयुग क्रिकेट पुरार संघाचा ऐतिहासिक विजय*

कुणबी समाज गोरेगाव पश्चिम विभाग संघटना क्रिकेट स्पर्धेत नवयुग क्रिकेट पुरार संघाचा ऐतिहासिक विजय*

कुणबी समाज गोरेगाव पश्चिम विभाग संघटना क्रिकेट स्पर्धेत नवयुग क्रिकेट पुरार संघाचा ऐतिहासिक विजय*

✍️-नितेश पुरारकर✍️
गोरेगाव लोणेरे विभाग प्रतिनिधी.
📞संपर्क-७०२११५८४६०.

गोरेगाव :- पुरार गोरेगाव-कुणबी समाज गोरेगाव पश्चिम विभाग क्रिकेट संघटना २०१८ साली उदयास आली.मुळात कुणबी समाज्यातील युवकांना क्रिकेट पटलावर मोठा प्लॅटफार्म उपलब्ध व्हावा.तसेच उच्च दर्जेचे खेळाडू निर्माण व्हावेत या उद्धेशाने संघटनेची स्थापना करण्यात आली. दर वर्षी प्रमाणे यावर्षी देखील कुणबी समाज गोरेगाव पश्चिम विभाग संघटनेच्या वतीने कुशेडे येथे भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.चारही बाजूने परिपूर्ण असलेले मैदान व सुंदर देखणी खेळपट्टी.अशातच बावीशी विभागातून सर्वच नामांकित संघाने सहभाग घेतला होता.अथक प्रयत्न करूनही काही संघांना विजय तर काही संघांना पराजय स्वीकारावा लागला.
नवयुग क्रिकेट संघ पुरार गेले अनेक वर्षे इतर गाव तसेच मुंबई ठिकाणी क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रमांक पटकावत होते परंतु कुणबी समाज पातळीवर एकत्रित क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरण्याचे स्वप्न किती केल्या पूर्ण होत नव्हते.अखेर श्री हनगोबा देवतेचा आशीर्वाद व सर्व संघाच्या अथक मेहनतीने तसेच पुरार संघा कडून भेदक गोलंदाजी आणि सुशील शिंदे यांच्या तुफान फंलदाजीच्या आधारे नवयुग क्रिकेट संघ पुरार प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. तर द्वितीय क्रमांक-श्री स्वयंभू गोठणेश्वर क्रिकेट संघ नवशी यांनी पटकावला व तृतीय क्रमांक-लिटल सन्नी क्रिकेट संघ कुशेडे यांनी पटकावला. नवयुग क्रिकेट संघ पुरार यांचे समाज पातळीवर प्रथम क्रमांकाचे स्वप्न पूर्ण झाल्याने संघामधेच नाही तर संपूर्ण पुरार गावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व विजयाच्या आनंद उत्सव पुरार गावामध्ये फटाक्याच्या अतिशबाजीने संघ व ग्रामस्थ याच्या समवेत मोठया जल्लोषात साजरा करण्यात आला.गोरेगाव पश्चिम विभाग क्रिकेट संघटनेच्या वतीने सुंदर आयोजन व नियोजन करण्यात आले तसेच क्रिकेट स्पर्धेला लाभलेले प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विजयी संघांना पारितोषिक व चषक देऊन सन्मानित करण्यात आले व आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे व सर्व संघाचे आभार मानून स्पर्धेची सांगता करण्यात आली.