जलजीवन मिशन योजनेला 1 वर्ष उलटूनही लोणेरकरांना करावा लागतोय पाण्याच्या समस्थेचा सामाना…..
✍️किरण शिंदे✍️
लोणेरे विभाग प्रतिनिधी
📞8237609655📞
लोणेरे :-जलजिवन मिशन अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत लोणेरेला 2023 या वर्षी 4 कोटी 50 लाख रुपयांची योजना मंजूर झाली असून काम सुरु होऊन एक वर्ष उलटूनही अद्याप पाईपलायनचे काम पूर्ण न झाल्याने लोणेरे, लोणेरे वाडी नवघर, उसरघर आणि उसरघर वाडी नवघर या गावांना पाण्याचा पुरवठा मुबलक प्रमाणात होत नसल्याने लोकांचे पाण्यापासून हाल होत आहेत. मार्च 2023 पासून जुनी पाईपलाईन राष्ट्रीय महामार्ग 66 च्या रुंदीकरणात पूर्णपणे तोडफोड झाली आणि ग्रामस्थांनां एप्रिल, मे आणि जुन महिन्यात पाणी मिळाले नाही. आणि त्यानंतर तात्पुरती दुरुस्ती नंतर पाहिजे तसा फ़ोर्स नसल्याने लोकांना आजपर्यंत मुबलक पाणी मिळले नाही. पाणी मिळत नसले तरी ग्रामपंचाय कडून पाणीपट्टी मात्र वसुल केली जात आहे. तरीही त्यातूनच आपली वैयक्तिक पाण्याची गरज भगवण्यासाठी गावातील लोक 400 रु प्रती टँकर खर्चून पाणी मागवत आहेत. मात्र जळजीवन मिशन योजने अंतर्गत सुरु असलेल्या पाईप लाईनचे काम ठेकेदाराकडून वेळेत पूर्ण न झाल्याने 4 गावातील लोकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे…
ग्रुप ग्रामपंचायत लोणेरे सरपंच प्रकाश टेंबे यांनी पाईपलईनचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून या एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपर्यंत पाईपलाइनचे काम पूर्ण होऊन लोकांना भरपूर पाणी मिळेल असे सांगितले आहे. तरी लोणेकरांची पाण्यासाठीची वणवण आता लवकरच संपणार असे चित्र दिसत असले तरी ठेकेदाराकडून मंद गतीने सुरु असलेले काम आणि ग्रामपंचायत कडून सक्तीने वसुल करत असलेल्या पाणीपट्टी यावर मात्र ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे…