महायुतीच्या कार्यकर्त्यांचा बारणेंवर बहिष्कार
महायुतीत काम करण्यास पळसदरी ग्रामपंचायत मधील कार्यकर्त्यांचा बहिष्कार स्थानिक आमदारांवरील नाराजी
✒️रुपेश महागावकर
कर्जत खालापूर प्रतिनिधी
📞93731 57184
कर्जत :- महायुतीमधील आमदार यांचा महायुतीतील कार्यकर्त्यांना कामासाठी विरोध असल्याने लोकसभा निवडणूक मध्ये महायुतीवर बहिष्कार करणार असल्याचे पत्र पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांनी श्रीरंग बारणे यांना लिहिले आहे. कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक ग्रामस्थ शेतकरी म्हणून गेले वर्षभर कल्पतरू एरिया प्रकल्पमध्ये काम मिळवण्यासाठी उपोषण, आंदोलन, अर्ज, विनंत्या, बैठका करून झालेले आहे. मात्र महायुतीतील शिंदे गटाचे आमदार काम मुळे राजकीय भावनेने विरोध करीत आहेत. कंपनी प्रशासनावर दबाव आणून कोणत्याही प्रकारे काम मिळू नये अशी विरोधी भूमिका घेत आहेत. आम्ही पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील प्रामुख्याने नांगुर्ले, तिघर येथिल कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मतदान न करण्याचा निर्णय महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. न्याय मिळत नाही तोपर्यंत महायुतीचे काम करणार नाही. असा पवित्रा येथील कार्यकर्त्यांनी घेतलं आहे. पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील महायुतीचे कार्यकर्ते मधील
१ ) रवींद्र सखाराम देशमुख (माजी पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी कोन्ग्रेस पार्टी )
2)राजेंद्र पंढरीनाथ निगुडकर (सरचिटणीस, राष्ट्रवादी कोन्ग्रेस पार्टी, कर्जत )
३ ) अनिल हरिश्चंद्र देशमुख (ज्येष्ठ कार्यकर्ते, शिवसेना )
४) राकेश रघुनाथ मरले (माजी सभापती, शिवसेना )
५) सौ. पुजा प्रताप सुर्वे (विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रवादी कोन्ग्रेस पार्टी, कर्जत )
६ ) भरत चंदर कदम (ज्येष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादी कोन्ग्रेस पार्टी)
7 )रुपेश भाऊ पवार (सरचिटणीस,राष्ट्रवादी युवक कोन्ग्रेस पार्टी, कर्जत )
…………………….आणि महायुतीचे शेकडो कार्यकर्ते यांनी महायुतीच्या उमेदवारावर बहिष्कार केला आहे.