भिमराव सुर्यतळ यांना राज्यस्तरीय कलाभुषण पुरस्काराने सन्मानित
श्रमजीवी परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान.
✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा:- श्रमजीवी परिवाराच्या वतीने १८ वे राज्य स्तरीय स्नेहसंमेलनाचे आयोजन दापोली येथे रसिक रंजन नाट्यगृहात संपन्न होत असताना विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाज भुषण,कलाभुषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.म्हसळा तालुक्यातील शासकीय सेवेत असणारे भिमराव सुर्यतळ यांना यंदाचा श्रमजीवी परिवाराच्या वतीने कलाभुषण पुरस्कार प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, या वेळी पुरस्कार स्वीकारताना सौ सुर्यतळ देखील उपस्थित होत्या, भिमराव सुर्यतळ यांनी म्हसळा तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, आपली शासकीय सेवा सांभाळत गायनाचा, काव्य तसेच गीत लिहणे हा त्यांचा आवडता छंद जोपासत आपल्या काव्याच्या व गायनाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्य केले तसेच तालुक्यातील मराठी शाळेत जावुन संगितामधुन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे व पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले, अनेक स्पर्धेत परिक्षक म्हणून देखील भुमिका साकारली, तालुक्यात प्रत्येक उत्सव, जयंती, विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सुर्यतळ यांची आवर्जून उपस्थित राहून आपल्या सुमधुर आवाजाने सर्व श्रोते रसिकांना अगदी मंत्रमुग्ध करीत, अशा विविध कला जोपासणारे भिमराव सुर्यतळ यांना श्रमजीवी परिवाराच्या वतीने राज्य स्तरीय कलाभुषण पुरस्कार मिळाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण होऊन अनेक स्तरावरून भिमराव सुर्यतळ यांचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती ब्रृहनमुंबई चे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी, श्रमजीवी परिवाराचे प्रमुख प्रकाश कावाणकर, हरेश कावाणकर, तसेच उद्योजक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.