रायगड जिह्यातील शिवसैनिक सुनील तटकरे यांचेच काम करणार.— आम. भरतशेठ गोगावले.
सुनील तटकरे आणि भरतशेठ गोगावले यांचे वितुष्ट संपले
किशोर पितळे-तळा तालुका प्रतिनीधी ९०२८५५८५२९
तळा :- आमच्यातील मतभेद आता दूर झाले असून रायगड जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक आता महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचेच काम करणार असल्याचे प्रतिपादन आ.भरतशेठ गोगावले यांनी केले तळा येथे केले लोकसभा निवडणुकीच्या पार्र्वभूमीवर तळा शहर येथील मेकडे हाॅल येथे (दि.७ एप्रिल ) मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी गोगावले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, यापूर्वी आमच्यात असलेले मतभेद मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एकत्र बसवून दूर केलेले आहेत.त्यामुळे शिवसेना शिंदेगट सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना भरघोस मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या सभेसाठी रायगड जिल्हा शिवसेना प्रमुख प्रमोद घोसाळकर,जिल्हा युवा अधिकारी विपुलउभारे, तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ,शहर प्रमुख राकेश वडके , जिल्हा कोअर कमेटी सदस्य लीलाधर खातू, नगरसेवक नरेश सुर्वे,सिराज खाचे,नगरसेविका नेहा पांढरकामे,अॅड.चेतन चव्हाण,पदाधिकारीशिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आम.गोगावलेपुढेम्हणालेकी,राज्यातीलमहायुतीचा संदेश जिल्ह्यातील प्रत्येक गावात, घरामध्ये पोहोचवा यासाठी सर्वच तालुक्यात मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.आज रायगड जिल्ह्यातील दोन खासदार अन् सातही आमदार महायुतीचे शंभर टक्के आहेत ते आगामीलोकसभानिवडणुकी मध्ये ही राहतील,असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला.येणाऱ्या पुढील विधानसभा निवडणुकीसाठी अशाच प्रकारचे नियोजन महायुतीच्या वतीने करण्यात येईल असे त्यांनी सांगितले या पुढील महायुतीच्या सभा एकत्रित होणार असल्याचे त्यांनी सांगितले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ४५ प्लसचा जो नारा दिला आहे त्यासाठी रायगडचा शिलेदार सुनील तटकरे यांना लोकसभेत पाठवा आणि मोदींचे हात बळकट करा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर तालुका प्रमुख प्रदुम्न ठसाळ यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.
कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांच्यातील राजकीय वितुष्ट जुने आहे. गोगावले यांनी तटकरे यांच्यावरती टीका करण्याची एकही संधी राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतरही सोडली नव्हती.इतकेच नाहीतरआदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्यास गोगावले यांनी जाहीरपणे विरोध केला होता.म्हणून आजपर्यंत रायगडच्या पालकमंत्री पदाची धुराही उदय सामंत यांच्याकडेचआहे.परंतुलोकसभानिवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील या दोन्ही नेत्यांचे वीतुष्ट आता संपले असून महायुतीच्या रूपाने ते रायगडलोकसभा निवडणुकीत एकत्र आल्याने भरघोस मतांनी सुनील तटकरे यांना निवडून आणणार असल्याचे वातावरण सध्या पहायला मिळत आहे.