सोमय्या ग्रुपच्या वतीने गुढी पाडवा थाटात साजरा
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 9 एप्रिल
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या ग्रुप तर्फे गुढी पाडवा नुतन वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष पी.एस आंबटकर, संस्थेचे उपाध्यक्ष पियुष आंबटकर, व्यवस्थापक अंकिता आंबटकर, प्राचार्य जमीर शेख, उपप्राचार्य दीपक मस्के, प्रा.राजकुमार, प्रा.अमित जोगी रजिस्ट्रार बिसन आदी उपस्थित होते, सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून गुढी उभारण्यात आली.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष पी.एस.आंबटकर यांनी करीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. चैत्रातील पहिला दिवस गुढ्या तोरणे उभारून साजरा करण्याची परंपरा जपताना नवनवीन प्रवाह मिसळताना दिसत आहेत . गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो.
या कार्यक्रमाला सर्व विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .