औरंगाबादमध्ये महिलांचा विक्रम, पूर्ण 9 पैकी 9 जागांवर फक्त महिलाच विजयी.
औरंगाबाद :- औरंगाबाद जिल्ह्यातील ढाकेफळ गावात महिलांनी विक्रम केला आहे. हाती आलेल्या निकालांनुसार, गावातील 9 पैकी 9 जागांवर फक्त महिलाच विजयी झाल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ढाकेफळ ग्रामपंचायतीमध्ये हा निकाल लागला असून गावात एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. गावकऱ्यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात महिलांना संधी दिली होती. त्यामुळे हा विक्रम पाहायला मिळत आहे.