प्रभु श्री रामचंद्र यांची मुर्ती प्रदान करुन श्री रविप्रभा मित्र संस्थेला राज्य स्तरीय पुरस्काराने केले सन्मानित
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही गिरगावकर सन्मान सोहळ्याचे आयोजन व भव्य शोभायात्रा
✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा:आम्ही गिरगावकर टिम यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदा ही चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वर्धापनदिन साजरा करण्यात आला व भव्य स्वरुपात शोभायात्रा काढण्यात आली तसेच महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला, या वेळी म्हसळा तालुक्यातील श्री रविप्रभा मित्र संस्था ,या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य या विषयावर अनेक उपक्रम राबवून लोकप्रिय व कमी वेळात नावारूपाला आलेली संस्था या संस्थेला आम्ही गिरगावकर टिम यांच्या वतीने आम्ही गिरगावकर सन्मान २०२४ राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर होऊन दिग्गज मान्यवर शिवसेना नेते नितीन नांदगावकर, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सहायक सचिव हर्षल प्रधान, टिमचे अध्यक्ष गौरव सागवेकर, सचिव मिलिंद वेदपाठक, महिला सचिव शिल्पा नायक, रा. जिल्हा सदस्य नागेश पोतदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लाड यांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व प्रभु श्री रामचंद्र यांची मुर्ती प्रदान करुन संस्थेला सन्मानित करण्यात आले, सन्मान स्वीकारताना संस्थेचे सल्लागार संतोष उध्दरकर, खजिनदार सुशांत लाड, सदस्य दिलीप करंदीकर, नंदु महाडिक, बैसाणेसर आदि पदाधिकारी उपस्थित होते.श्री रविप्रभा मित्र संस्थेला पुरस्कार मिळाल्याने तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे,अतिशय उत्साहात व जल्लोषात हा कार्यक्रम गिरगाव,केळेवाडी येथे संपन्न होत असताना, शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत अनेकांनी सहभागी होऊन मोठमोठे रथ साकारण्यात आले होते यावेळी, राधाकृष्ण,छत्रपती शिवाजी महाराज,तिरुपती बालाजी,वारकरी दिंडी, राज्यघटना हे रथ सर्वांचे आकर्षक ठरले,या सन्मान सोहळ्याला व शोभायात्रेत हजारोंच्या संस्थेन जनसागर उपस्थित होते.
———————————–
आम्ही गिरगावकर टिम यांच्या वतीने आमच्या संस्थेला आम्ही गिरगावकर सन्मान राज्य स्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे. या मुळे खरच खूप आनंद होत परंतु या आनंदा बरोबर पुरस्कार मिळाल्याने आमची जबाबदारी देखील वाढली आहे आणि या पुढे देखील आम्ही सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य या विषयावर अधिक काम करु. आमच्या संस्थेचे हे पहिले यशस्वी पाऊल पडले आहे.
रवींद्र लाड.
संस्थापक अध्यक्ष
श्री रविप्रभा मित्र संस्था. रायगड