गडचांदुर, वणी, चंद्रपूर येथे प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा
• मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे राजेश बेले यांचे आवाहन
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 10 एप्रिल
चंद्रपूर,वणी,आर्णी लोकसभा क्षेत्राचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला मार्गदर्शन करण्याकरिता पक्षाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर येणार आहेत. या सभेत मोठ्या संख्येने या लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजेश बेले यांनी केले आहे. ही सभा गुरुवार, 11 एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजता शेख चमन यांच्या शाळेचे मैदान, सारंग पेट्रोल पंप जवळ, गडचांदुर येथे सकाळी ११:०० वाजता शासकीय मैदान वणी आणि सायंकाळी ६:०० वाजता न्यू इंग्लिश (दर्गा) ग्राउंड चंद्रपूर येथे संपन्न होत आहे. फुले,आंबेडकरी विचारांच्या सत्ता परिवर्तन जाहीर सभेत नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन राजेश बेले यांनी केले आहे.