धार्मिक मुद्यांवर प्रभावित न होता क्षेत्राच्या विकासासाठी मविआ ला मतदान करा- प्रदेश अध्यक्ष मा. जयंत पाटील
प्रवीण शेंडे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी
तिरोडा :- आज कुंभारे लॉन, तिरोडा येथे भंडारा – गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ तिरोडा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी मार्गदर्शन करताना जयंत पाटील यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणे मान्य नाही म्हणून आपल्या अनेक जुने सहकारी आता पुन्हा एकदा आपल्यात सामील होत आहेत. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना मानणारा मोठा मतदार वर्ग श्री. प्रशांत पडोळे यांना निवडून आणतील हा विश्वास आहे. नेते पक्ष सोडून गेल्यामुळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना मोठी संधी उपलब्ध झाली. त्यामुळे आपल्या पक्षात गुणात्मक बदल झालेला आहे.
जगभरातील हिंदू बांधवांनी देणगी दिली त्यातूनच भव्य राम मंदिर उभारले गेले. त्यामुळे या मंदिर उभारणीचे श्रेय त्या प्रत्येक बांधवाला जाते ज्यांनी निर्माण कार्यात मदत केली. त्यामुळे राम मंदिरावर मते मागण्याचा अधिकार कोणत्याच पक्षाचा नाही. भावनाविवश न होता आपल्या समस्या दूर करण्यासाठी योग्य उमेदवार निवडा असे प्रतिपादन केले.
यावेळी महिला प्रांतअध्यक्ष सौ. रोहिणीताई खडसे, युवक प्रांतअध्यक्ष मेहबूब भाई शेख, विद्यार्थी प्रांताध्यक्ष सुनिल गव्हाणे, माजी खासदार मधुकर जी कुकडे, श्री सौरभ मिश्रा, श्री शैलेंद्र तिवारी, जिल्हा अध्यक्ष श्री दिलीप बन्सोड, युवा नेता रविकांत बोपचे, जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, महिला जिल्हा अध्यक्ष सौ मंजुताई डोंगरवार, अनुसुचित जमाती सेल जिल्हाध्यक्ष श्री शामराव जी उईके, श्री अशोक अरोरा, शहर अध्यक्ष पवन मोरे, संचालक श्री ओम पटले, तालुका अध्यक्ष रमेश टेंभरे, तालुका अध्यक्ष हेमराज अंबुले, तालुका अध्यक्ष प्रकाश बघेले, श्री गिरधर जी बिसेन, श्री रमेश पटले, अनुसुचित जमाती सेल तिरोडा तालुका अध्यक्ष श्री भोजराज उईके, श्री रामेश्वर हलमारे,माजी महिला व बालकल्याण सभापती सौं जोशना शेंडे, माजी नगर सेविका पूजाताई उरकुडे,सौ वनिताताई ठाकरे, सौ रश्मी गौर,तिरोडा महिला अध्यक्ष सौ भाग्यश्री ताई केळवतकर, गोरेगाव महिला अध्यक्ष सौ वैशालीताई तूरकर, कार्याध्यक्ष सौ छायाताई टेकाम, सरपंच दिपलता ठकरेले आदिंसह #मविआ चे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.