हिरेन हिसाळकेने पुन्हा केला नवीन विक्रम; ७५ किमी साडेपाच तासात पूर्ण केला.

हिरेन हिसाळकेने पुन्हा केला नवीन विक्रम; ७५ किमी साडेपाच तासात पूर्ण केला.

हिरेन हिसाळकेने पुन्हा केला नवीन विक्रम; ७५ किमी साडेपाच तासात पूर्ण केला.

हिरेन हिसाळकेने पुन्हा केला नवीन विक्रम; ७५ किमी साडेपाच तासात पूर्ण केला.

✒️संदेश साळुंके ✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞९०१११९९३३३📞

नेरळ :- नेरळ गावातील चहा विक्रेत्याचे ११ वर्षीय मुलाने आज भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी तब्बल ७५ किलोमीटर सायकल प्रवास करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली. हिरेन राम हिसाळके हा ११ वर्षीय मुलगा नेरळ गावातील आज डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नेरळ येथून सायकल ५ किलोमीटर अंतर साडे पाच तासात पूर्ण करून महापुरुषानाच्या कार्याला अभिवादन केले.

११ वर्षीय हिरेन नेरळ येथील विद्या विकास शाळॆत शिकत असून त्यांचे वडील राम हिसाळके हे चहाची टपरी चालवतात. या विद्यार्थ्याला सगुणाबाग कृषी पर्यटन केदारने सायकल भेट दिली आहे. त्या सायकल वरून हिरेन हा अनेक प्रकारची आव्हाने पेलत सायकल वरून प्रवास करीत आहे.त्याने २६ नोव्हेंबर २०२३ रोजी नेरळ ते खोपोली नॉन स्टॉप ३४ किलोमीटर सायकल राईड ०२ तास १० मिनिटे देशाचा तिरंगा फडकवत केली आणि २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप नागरिकांना आणि पोलीस बांधवांना श्रद्धांजली वाहिली आहे.दोन जानेवारी २०२४ रोजी नेरळ ते सिद्धगड ४० किलोमीटर नॉन स्टॉप सायकल चालवत ते अंतर तीन तास १० मिनिटात पूर्ण केले.१९४३ च्या चले जाव आंदोलनात सिद्धगडाच्या पायथ्याशी वीरगती प्राप्त झालेल्या हुतात्मांना अभिवादन आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी हा सायकल प्रवास केला. २८ जानेवारी २०२४ रोजी नॅशनल युथ डे व रिपब्लिकन रन- राईट चॅलेंज या दोन्ही राष्ट्रीय आयोजित स्पर्धेत सहभाग घेऊन नॉन स्टॉप ५५ किलोमीटर अंतर ४ तास १५ मिनिटात पुर्ण केले. तर २३ मार्च २०२४ रोजी जागतिक हवामानशास्त्र दिन निमित्ताने सायकल वर वेगवेगळे संदेशाचे फळक तोंडाला ऑक्सिजन मार्क्स पाठीवर कृत्रिम पध्दतीचा ऑक्सिजनची बाटला घेऊन सुमारे तीन तास नेरळ गावात वेगवेगळ्या ठिकाणी सायकल वरून फिरत जागतिक प्रदूषणाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.मतदार जनजागृती मोहिमेत सायकल चालवत खोपोली ते कर्जत असा १९ किलोमीटर प्रवास सायकल वरून केला आहे.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आज पहाटे साडे पाच वाजता हिरेन राम हिसळके या विद्यार्थीने सायकल वर बसला. त्यावेळी त्यांची आजीही आवर्जून उपस्थितीत होती. नेरळ गावातील मोहाची वाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हिरेन ने आपला प्रवास सुरु केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सकाळी ५.३० वाजता नेरळ कल्याण रस्त्याने वांगणी कडे प्रस्थान केले. पुढे वांगणी येथून कळंब रस्त्याने पाषाणे आर्डे साळोख मार्गे कळंब गाठले. त्यात साळोख आणि आर्डे येथे स्थानिकांनी त्याचे स्वागत केले. कळंब येथून मुरबाड कर्जत राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने कशेळे असा पुढे कड़ाव येथून कर्जत शहरात सायकल घेऊन गेला.कर्जत येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कर्जत कल्याण रस्त्याने डिकसळ गाठले. येथे डिकसळ येथे शांतिदूत मंडळाच्या वतीने तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हिरेन चा सत्कार करण्यात आला आणि तेथून कल्याण रस्त्याने नेरळ गाठले..

नेरळ येथे हुतात्मा चौकात हुतात्म्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. हुतात्मा चौकात नेरळ ग्रामपंचायत उप सरपंच मंगेश म्हसकर, माजी उप सरपंच अंकुश शेळके यांच्यासह माथेरान नागरी पतसंस्थेचे संचालक नितीन शेळके, संजय घाटे, सुभाष नाईक, महेश भगत,आणि पोलीस अधिकारी कर्मचारी आदींसह अनेक कार्यकर्ते यांनी त्याचे स्वागत केले. हुतात्मा स्मारक संतीचे वतीने अध्यक्ष संतोष पेरणे यांनी हिरेन चा पुष्पहार घालून सत्कार केला.
या सर्व प्रवासात हिरेन ची साथ त्याचे वडील राम हिसाळके, त्याचे मार्गदर्शक दिवाकर कुलकर्णी,तसेच खांडा गावातील तरुण विग्नेश हिसाळके, विपुल हिसाळके ,वैभव हिसाळके आदी सोबत होते. हिरेन याने हा ७५ किलोमीटर सायकल प्रवास सकाळी साडे पाच वाजता सुरु केला आणि अकरा वाजता नेरळ गावातील सम्राट नगर येथे पूर्ण केला. ७५ किलोमीटर अंतर साडे पाच तासात पूर्ण केला.केला पुन्हा नवीन विक्रम; ७५ किमी साडेपाच तासात पूर्ण केला.