संत रोहिदास नगर पुरार येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

✍️-नितेश पुरारकर✍️
गोरेगाव विभाग प्रतिनिधी
📞संपर्क-७०२११५८४६०.

पुरार रायगड- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६ हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार.देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही संबोधले जाते .आज अशाच दूरदृष्टी असलेले आदरणीय परमपूज्य .विश्वरत्न डॉ बाबासाहेब यांची जयंती संत रोहिदास नगर पुरार येथे आदर भावनेने व मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.१४ एप्रिल २०२४ रोजी ठीक सकाळी १०वाजल्यापासून संत रोहिदास समाज हॉल येथे रोहिदास समाज्यातील सर्व समाज बांधव तसेच माता भगिनी व बालक यांनी एकत्र येऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन विचारांना तसेच त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार हार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.तसेच बहुजन प्रतिपालक.श्री छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरु संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बाबासाहेब यांच्या जीवनावर प्रत्येकांनी आपले मनोगत वेक्त केले व जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच मुंबई मध्ये राहत असलेले सर्व समाज बांधव यांनी देखील शुभेच्छा दिल्या. संत रोहिदास विकास मंडळ पुरार अध्यक्ष यांनी सर्वांना जयंती निमित्त शुभेच्या दिल्या व आभार मानले. अखेर पुन्हा एकदा सर्व समाज बांधव भगिनी यांनी सर्व थोर समाज सुधारकांच्या नामाचा जयघोष घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.