सोमय्या पॉलीटेक्नीक तर्फे स्पर्श २०२४ रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन संपन्न

सोमय्या पॉलीटेक्नीक तर्फे स्पर्श २०२४ रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन संपन्न

सोमय्या पॉलीटेक्नीक तर्फे स्पर्श २०२४ रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन संपन्न

सोमय्या पॉलीटेक्नीक तर्फे स्पर्श २०२४ रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन संपन्न

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 15 एप्रिल
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक, स्पर्श २०२४ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम प्रमुख अतिथिंच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत नटराजच्या मूर्तीला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात सोमय्या पॉलीटेक्नीक,सोमय्या आय टी.आय. तसेच डीफार्म विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. फॅशन शो, डान्स शो, रॅम्प वॉक व गायन स्पर्धा घेण्यात आल्या. प्रथम आणि दद्वितीय क्रमांक प्राप्त कर्त्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. अर्पिता वांढरे,मग्न शोम,कार्तिक वावराडपे,शुभांषु जुमडे,श्रद्धा राऊत,इशिका लोहकरे या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष पी.एस आंबटकर, संस्थेचे उपाध्यक्ष पियुष आंबटकर, व्यवस्थापक अंकिता आंबटकर,सचिव प्रीती आंबटकर,प्राचार्य फैय्याज अहमद, प्राचार्य राजदा सिद्दकी,प्राचार्य फैय्याज अहमद, प्राचार्य जमीर शेख,उपप्राचार्य दीपक मस्के, प्रा.अनिल खुजे ,प्राचार्य राजकुमार, रोटरी क्लबचे श्री.अशोक हंसानी,श्री.भालचंद्र चांदे,मनीषा पडगेलवॉर, रजिस्ट्रार राजेश बिसन सर उपस्थित होते,
प्रमुख पाहुण्यानी आपले मनोगत वक्त करीत आपण ज्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतो,ज्या क्षेत्राची आवड आहे,अशा क्षेत्राची करिअरसाठी निवड करावी,केवळ क्षेत्र आवडल्याने यश मिळत नाही तर करिअर निवडल्यानंतर ज्या क्षेत्रात अविरत निष्ठेने काम केल्यास यश मिळते. पाहुण्यानी आपले मनोगत वक्त करीत ,अधिकारी बनल्यानंतर देश सेवा डोळ्यासमोर ठेऊन कार्य करण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्याना केले तसेच अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संचालन प्रा.नवशाद सिद्धकी यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.