32 रायगड लोकसभा मतदारसंघ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी पाच नामनिर्देशन पत्र दाखल
✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333
अलिबाग;-रायगड , दि. 15 – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये 32 रायगड लोकसभा मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी (दि.15 एप्रिल) पाच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली.
मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात 32 रायगड लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे ..
श्री अनंत गिते (अपक्ष) (1अर्ज),
श्री अनंत बाळोजी गिते(अपक्ष)) (1अर्ज),
श्री. अनंत गंगाराम गिते (1+ 3 अर्ज) (शिवसेना) उद्धव बाळासाहेब ठाकरे,
नितीन जगन्नाथ मयेकर अपक्ष (1),
आस्वाद जयदास पाटील अपक्ष (1).