चंद्र सुर्य व तारे असेपर्यंत डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान कोणीही बदलू शकत नाही–मंत्री अदितीताई तटकरे
✒️:किशोर पितळे:तळातालुका प्रतिनीधी ✒️९०२८५५८५२९
तळा :- तळा डाॅ.बाबा साहेब आंबेडकर यांचा १३३वी जयंती उत्सवाचे आयोजन बौध्दविहार समाज मंदीरात आयोजन करण्यात आले होते यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केले.व बौध्द अनुयांनाना संबोधित करताना म्हणाल्या कि घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेबांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला हक्क आरक्षण संविधानाने मिळाले यामुळेच महीला लोकप्रतिनिधी आहे. डाॅ.बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करायचे असेल तर आपल्याला सविंधान तंतोतंत आपण पुढच्या पिढीला त्या पुढच्या पिढीला परंपरांगत पुढे पोहोचले पाहिजे तरच पिढीने चालवावे.त्यांनी लिहीलेले संविधान जो पर्यंत चंद्र सुर्य व तारे असे पर्यंत कोणीही बदलू शकत नाही.काही नतदृष्ट लोक संविधान बदलले जाईल अशा वावट्या उठवत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असले तरी कोणीही बदलू शकत नाही असा विश्वास या निमित्ताने दिला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रामदास मोरे होतै.किशोर मोरे,उत्तम लोखंडे,अनंत लोखंडे माजी महिला जि प.सभापती गिता जाधव ऍड.उत्तम जाधव धनराज गायकवाड,प्रकाश गायकवाड विजय जाधव आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.तसेच तालुक्यातील बौध्द अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकाश गायकवाड यांनी केले.