लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणगांव पोलिसाचा रूटमार्च …..
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवार दि.१५ एप्रिल रोजी माणगांव परिसरात सायंकाळी पोलीस ठाणे हद्दी पासून कचेरी रोड ते मुख्य बाजारपेठ मार्गी पोलिसांनी रूटमार्च केले.रायगड लोकसभेची निवडणूक ७ मे रोजी जाहीर झाली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी माणगांव पोलिसांनी सोमवार दि.15 एप्रिल रोजी रूटमार्च केले या प्रसंगी उप विभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी,पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सह पोलीस निरीक्षक मनोज भोसले, पोलीस उप निरीक्षक कीर्तीकुमार गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, सूर्यकांत भोजकर,यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या सशस्त्र रूटमार्चमध्ये आर. सी.एफचे अधिकारी, दंगल नियंत्रण पथक आर सी पी,पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार शस्त्र, लाठी हेल्मेट वाहनासह सहभागी झाले होते.