चंद्रपुरात वंचित बहुजन आघाडीचा भव्य रोड शो
🖋️ मयूर डांगे
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
📱 ९७६४६४३२४९
चंद्रपूर : 16 एप्रिल
शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. या रोड शो मध्ये चंद्रपूर चे माजी एसपी व वंचित बहुजन आघाडी धुळे लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उम्मेदवार तसेच वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक अब्दुल रहमान यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उम्मेदवार राजेश बेले यांच्या प्रचारार्थ ही रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीची सुरुवात गांधी चौक येथून करण्यात आली. यादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे व जटपुरा गेट येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला व छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून माल्यार्पण करण्यात आले. गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा या रॅलीचा मार्ग होता. रॅलीत “३३ कोटी झाडे कोठी आहे, येथी हाय येथी हाय”, “भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची” अश्या अनेक घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग, वर्धा जिल्ह्याचे निरीक्षक बंडू नगराळे, महिला आघाडी चंद्रपूर महानगर अध्यक्षा तनुजा रायपुरे आदी पदाधिकारी यांच्यासह वंचितचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.