तळा तालुक्यांत उष्णतेचा पारावाढला. अपुऱ्यापडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी घटली.जलस्त्रोत आटले.
✒️किशोर पितळे: तळातालुका प्रतिनीधी✒️९०२८५५८५२९
तळा:जून २०२३ महिन्यापासून सप्टेंबरमहिन्यापर्यंतत्याकाळामध्ये पावसाची परिस्थिती अतिशय कमी प्रमाणात झाल्यामुळे वर्ष अखेरमेएंडिंग किंवा जेष्ट महिन्यापर्यंत नदी तलावातले विहिरीतले पाण्याची पातळी घटल्यामुळे काही भागात पाणी पिण्याचे हाल झाले आहेत डोंगर कपारीतून धरणाकडे व नदी कालव्यात जाणारे पाणी कमी झाले.साठा राहिला नाही त्यामुळे मे,जून अखेरीस पाणी पिणे देखील मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर त्याचा परिणाम पाण्यावरती झाला आहे त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाला आहेजलस्त्रोतआटले.शेतकऱ्याला मुंबलक प्रमाणात पाणी न मिळाल्यामुळे कडधान्य देखील कमी झाली आहेत सप्टेंबर नंतर पाऊस पडलाच नाही ऑक्टोबर नंतर तो पाऊस पडला तो बेहिशोबी पडला थंडी पडलीच नाही त्यामुळे ज्या मोसम मध्ये अनुकुल वातावरण न मिळाल्याने आंबा काजू,मोहर आले नाही. आंबा पिके आलीच नाही व पाण्याच्या पातळीत घट झाली पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतअसल्यानेजमिनीला ओलावा राहिला नाही दोनशे फुटाच्या खाली पाण्याची पातळी असून देखील खाली गेली आहे त्यामुळे गुराढोरांना देखील पाणी पिण्यास मिळत नाही. डोंगराळ निसर्गरम्य हिरवेगार वातावरणात तालुका ग्रामीण भाग मोठा आहे. सद्यस्थितीत चैत्र महिनानिघालेला असून मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढलेआहे.प्रतिवर्षापेक्षा यंदा तालुक्यांत उष्णतेचा पारा वाढलाअसून तसेच अपुऱ्या पडलेल्यापावसामुळे पाण्याची पातळी घटली.जलस्त्रोतबंदझाले. सद्यस्थीती त दररोजचे तापमान ४२ते ४५ड्रीग्री सेल्सीअस होत आहे.बाजारपेठामधून नागरीक येत नसल्याने बाजार पेठात शुकशुकाट पडल्याचे चित्र दिसत आहे.रात्रीचे तापमान साधारण ४/५अंश सेल्सीऐस ड्रीग्रीने कमी होत असले तरी उष्णता मानात फारसा फरक जाणवत नाही. नेहमी जवळपास आल्हाददायक असणारे वातावरणाची झालेली सवय वाढत्या तापमानामुळे त्रासदायक झाली आहे.याकाळात पाण्याची गरज अधिक असल्याने आजारपणात वाढ उष्णतेचा त्रास घामोळे,कातडीचे आजार,यांनी डोके वर काढले आहे.ग्रामीण भागातील परिस्थीती तर फार बिकट आहे. शासनाने जल जीवन मिशनच्या कामाची ऐंशी कि तैशी परिस्थीती असल्याने मोठा महिला वर्गाला त्रास संहन करावा लागत आहे पाणी पातळी धरण,नाले बोरिंग बंद असल्याने रात्रीचा दिवस करून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत शोधावे लागत आहेत त्यात में महीना चाकरमानी गावाकडे सुट्टीला येण्याचा ओढा असल्यानेअधिक पाण्याची गरज लग्नकार्य, गोंधळ देवकार्य कुळधर्म गावकीची, भावकीची पुजा यामुळे पिण्याचा अधिकखप वाढत असतो.तरी देखील किती प्रमाणात पाणी वापरायचे असा सर्व साधारण प्रश्र पडला आहे.