श्री स्वामी समर्थ मंदिर राणेची वाडी तळा येथे मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न.
✒️किशोर पितळे :तळा तालुका प्रतिनीधी ✒️९०२८५५८५२९
तळा:- तळा राणेचीवाडी श्री स्वामीसमर्थ मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि.१५ एप्रिल२०२४रोजी परमपूज्य गुरुवर्य वै.अण्णासाहेब मस्के यांच्या कृपाशीर्वादाने श्री श्री सद्गूरू दादा महाराज दामले यांच्या हस्ते व ज्येष्ठ अधिकारी आबासाहेब मोरजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सकाळी ६ ते १२ प्रतिष्ठान सोहळा,सद्गुरु दादा महाराज दामले यांच्या शुभहस्ते, दुपारी १ ते३ नैवेद्य महाप्रसाद,सांय.५ वाजता ज्ञानगंगा भजनी मंडळ शिवापूर पुणे सुस्वरभजन,६वा. वाजता आरती ६.३० ते ७.३० ज्येष्ठ अधिकारी बाबासाहेब मोरजकर व स्वामी सेवेकरी स्वामीभक्त मान्यवरचे स्वागत समारंभ, ७.३० ते ८.३० दामले महाराजांचं अमृतवाणीचेप्रबोधन, ९ ते १० महाप्रसाद,११ वाजता ग्रामस्थ मंडळ राणेचीं वाडी यांचे भजन अशा कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आलेहोते.याकार्यक्रमाचे पौराहित्य संजय केळकर गुरुजी रेवदंडासहकारी यांनी केले कार्यक्रमाचे सर्व नियोजन ग्रामस्थ राणेची वाडी,मठ प्रवर्तक दानशूर जमीन दाते कै.लक्ष्मीबाई बाळकृष्ण चव्हाण वतीने आत्माराम चव्हाण यांनी उपलब्ध करून दिली होती त्यामुळे गेले पंचवीस वर्षापासून ची असणारी प्रतिक्षा साकार झाली यामठांमध्ये दररोज पुजासेवा,नित्यसेवा, प्रगटदिन,पुण्यतीथी परमपूज्य गुरुवर्य अण्णा मस्के यांनी ज्या पद्धतीने आखून दिले आहे. त्या प्रमाणेच सगळेच केलेजाणारच आहेत.यावेळी दामले महाराज यांनी आपल्या अमृतवाणीतून प्रबोधन करताना सांगीतले की मनुष्यांस प्राणीमात्रांना देखील नशीबी आलेले भोग हे भोगावेच लागतात त्याची तीव्रता हि अखंड नामस्मरणाने कमी होते.याविश्वात श्री स्वामी शिवाय कोणी नाही. जगी स्थळी काष्टी पाषाणी स्वामी आहेत.एकमेव स्वामींचा उपदेश आहे “भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.”अशक्य हि शक्य करतील स्वामी “स्वामी समर्थ चरित्र सारामृतांचे पठण करा. तारक मंत्राचा जप करा.असा उपदेशवाणीतूनकेला.भक्तांनाआलेल्या अनुभवाचे दाखले देखील दिले.अशा भक्तीमय उत्साही वातावरणात श्री. स्वामी समर्थ प्राणप्रतीष्ठापना सोहळा स्वामी सेवेकरी,ग्रामस्थांच्यासहभागातून संपन्न झाला.