चांदोरे रोहिदास वाडी येथे साई मंदिराचा २२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

चांदोरे रोहिदास वाडी येथे साई मंदिराचा २२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

चांदोरे रोहिदास वाडी येथे साई मंदिराचा २२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

चांदोरे रोहिदास वाडी येथे साई मंदिराचा २२ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

✍️ नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048 📞

माणगांव :- रामनवमीचा सन चैत्रमास शुक्ल पक्ष नवमीला साजरा केला जातो, भगवान श्री राम यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने साई श्रद्धा सेवा मंडळ चांदोरे, साई मंदिराचा २२ वा वर्धापन दिन रोहिदास विकास मंडळ चांदोरे, ओम साई महिला मंडळ, साई श्रद्धा सेवा मंडळ चांदोरे यांच्या संयुक्त विद्यमाने उपरोक्त मंडळाच्या वतीने बुधवार दि.१७ एप्रिल २०२४ रोजी रामनवमी दिनी श्री साई भंडारा व सत्य नारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते,
तसेच सकाळी ५ ते ६ काकड आरती ६ ते १० सत्नारायणाची महापूजा,११ ते १२.३० प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, व हळदी कुंकू, विद्यार्थी गुणगौरव सोहळा दुपारी १ ते ३ साई भंडारा ६ ते ९ साई पादुकांची मिरवणुक रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम या प्रमाणे दिवस भरामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले.
रामनवमी दिनी भगवान श्रीराम यांच्या जन्मोत्सवाचे अवचित्त साधून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सन्मानित करण्यात आले उपस्थित मान्यवर प्रथम नागरिक ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी शिंदे मॅडम उपसरपंच नथुराम चाचले साहेब, चांदोरे विभागीय पोलीस पाटील संतोष आंबेकर माजी सरपंच सखाराम मोहिते, माजी सरपंच विमल महाडिक, माजी सरपंच तृप्ती चांदोरकर , माजी सरपंच कृष्णा गोरेगावकर, ,ग्रामपंचायतीचे काही सदस्य,पंचायत समिती माजी सभापती सुजित शिंदे, जनार्धन मुरुडकर साहेब, रोहिदास विकास मंडळ माणगाव तालुका अध्यक्ष संतोष पुगावकर, खजिनदार अशोक चांदोरकर, गोरेगावच्या प्रतिनिधी संदेश गोरेगावकर, उपस्थित होते.

रोहिदास विकास मंडळ चांदोरे, ओम साई महिला मंडळ चांदोरे, तसेच साई श्रद्धा सेवा तिन्ही मंडळाचे सर्व पदाधिकारी सभासद बंधू तसेच महिला भगिनी बहु संख्येने उपस्थित होत्या. तसेच तालुक्यातील काही गावांतून तसेच पंचक्रोशीतील तमाम साई भक्त साई उपस्थित होते.