सर्वांनी मतदान करून लोकशाही भक्कम करण्यास सहभाग घ्यावा: राज्याध्यक्ष साईनाथ पवार
सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आ हे
✒️किशोर पितळे-तळातालुका प्रतिनीधी✒️९०२८५५८५३९
तळा :- तळा दिव्यांग मतदार जनजागृती
कार्यक्रमाचेआयोजनरोहातहसील कार्यालय आणि सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१९एप्रिल२०२४रोजी रोहा तालुक्यातील चणेरा विभागातीलकुणबी समाज मंदिरात करण्यात आले होते. यावेळी नायबतहसीलदारश्रीमती अंधारे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
डिस्ट्रिक आयकॉन तथा महाराष्ट्र अपंग कर्मचारी संघटनेचेराज्याध्यक्ष साईनाथ पवार यांनी दिव्यांग मतदार जनजागृती बाबत प्रमुख मार्गदर्शन केले. व त्यात त्यांनी दिव्यांग मतदारासाठी भारत निवडणूक आयोगाकडून केलेल्या सोयी सुविधा बाबत जसे की दिव्यांगाना घरुनमतदारकरण्याची सोय,मतदान केंद्रावर व्हीलचेअर ची व्यवस्था,रॅम रेलिंग तसेच दिव्यांगांना मदतनीसाची सोय, इत्यादी सुविधांबाबत प्रशासनाने लक्ष द्यावे.व मार्गदर्शन करताना म्हणाले कि.भारतीय घटनेने १८ वर्षावरील सर्वांनाच मतदान करण्याचा हक्क दिला आहे तो बजावणे हे आपले कर्तव्यच आहे. पाच वर्षात साधारण पाचवेळा मतदानहोते त्यावेळी आपण सर्वांनी योग्य उमेदवाराला मत देणे आपली जबाबदारी आहे त्यात सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे,तुमचे मत महत्त्वाचे आहे सर्वांनी मतदान करून लोकशाही भक्कम करण्यास सहभागदाखवा.दिव्यांग मतदारांचा टक्का वाढलेलादिसला पाहीजे असे आवाहन करून आपला आदर्श समाजा समोर ठेवा.असे सर्व दिव्यांग मतदारांना सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य अपंग कल्याणकारी संस्थेचे सचिव शिवाजी पाटील चणेरा विभाग प्रमुख प्रवीण मोरे गोरख बाबरे आदी दिव्यांग सदस्य तसेच मंडळ अधिकारी जयेश ठाकूर चणेरा तलाठी तेजश्री मोरे, चांडगाव तलाठी दीपक मोरे, कोकबन तलाठी विशाल चोरगे, परिवेक्षक तलाठी बाळासाहेब थोरात, अभिजीत महाडिकपोलीसपाटील रहूप भाई यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत मुंगळे व आभार कोतवाल रवी शिंदे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता मतदान करण्याची प्रतिज्ञा करून करण्यात आली.