रायगड लोकसभा मतदार संघात ७ उमेदवाराचे१३ अर्ज बाद
भावी खासदार होण्याचे स्वप्न धुळील
रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
मोबाईल नं.9420325993
अलिबाग :- लोकसभा मतदारसंघ निवडणूकीसाठी 28 उमेदवारींनी 40 अर्ज दाखल केले होते. शनिवारी झालेल्या छाननीमध्ये सात उमेदवारांचे 13 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत, तर 21 जणांचे 27 अर्ज वैध ठरले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनिकेत तटकरे, बहुजन समाज पार्टीचे मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी आणि अनिल बबन गायकवाड या उमेदवारांसह अन्य चार अपक्षांचे अर्ज बाद ठरले आहेत. 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच रायगडच्या घमासानचे चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणूक आयोगाचे निरीक्षक संजीव कुमार झा यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पार पडली. रायगड लोकसभा मतदार संघात खऱ्या अर्थाने इंडिया आघाडीचे शिवसनेचे अनंत गीते आणि महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यामध्येच लढत होणार आहे. मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तसा प्रचार शिगेला पोचत आहे. मतदार संघामध्ये इंडिया आघाडीने प्रचाराचा चांगलाच धुरळा उडवून दिला आहे. तसेच, महायुतीनेही प्रचारात रंगत आणल्याने राजकीय रणांरण चांगलेच तापले आहे.
लोकसभा निवडणूकीत राजकीय नशिब आजमावण्यासाठी हवशे-नवशे-गवशे सगळेच उतरले आहेत. तब्बल 28 उमेदवरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शनिवारी अर्जाची छाननी प्रक्रीया पार पडली. त्यामध्ये सात उमेदवारांचे 13 अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. अनिकेत तटकरे हे पर्यायी उमेदवार असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. त्यांनी एकच सूचक दिला होता. नियमाप्रमाणे त्यांनी सूचक दिले असते, तर त्यांचा अर्ज अवैध ठरला असता. अन्य उमेदवारांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र अपूर्ण असणे, विहीत नमुन्यात नसणे या कारणांनी त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत.
कोणत्या 7 उमेदवारांचे अर्ज बाद
अनिकेत सुनील तटकरे (नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी), नरेश गजानन पाटील (अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (बहुजन समाज पार्टी), उस्मान बापू कागदी (अपक्ष), अनिल बबन गायकवाड (बहुजन समाज पार्टी), भुपेंद्र नारायण गवते (अपक्ष), घाग संजय अर्जुन (अपक्ष)