म्हसळा श्री धाविर देव महाराज भव्य शोभायात्रा मिरवणूक
मिरवडणुकीत म्हसळेकर पारंपारिक वेषभुषेत सहभागी.
पालखी खांद्यावर घेऊन महिलांनी देखील धरला ठेका.
✍️संतोष उध्दरकर✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा : म्हसळाचे जागृत देवस्थान श्री धाविर देव महाराज मंदिराचे ग्रामस्थांनी काही वर्षा पूर्वी चैत्र शुध्द त्रयोदशीला जीर्णोद्धार सोहळा संपन्न केला होता. तेव्हा पासुन शहरात हिंदू ग्रामस्थ ट्रस्ट मंडळ यांच्या वतीने श्री धाविर देव महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
वाजत गाजत भाविक शोभा यात्रेत सहभागी होत ,श्री धाविर देव पालखीचे पुजन करून आशीर्वाद घेतले जाते, ही शोभायात्रा म्हसळा धावीरदेव मंदिरापासून ते कुंभारवाडा येथे येऊन पुजेचे मानकरी म्हसशिलकर बंधु यांच्या हस्ते पुजन करण्यात आले,त्यानंतर ही शोभायात्रा बसस्थानक येथे चौकात आल्यावर एक रिंगण करुन पालखी मोठ्या भक्तिभावाने खांद्यावर घेऊन नाचविली जाते,यावेळी महिला देखील मागे न राहता महिलांनी देखील पालखी खांद्यावर घेऊन नाचविण्यात आली,अतिशय उत्साहात व जल्लोषात,वाजत गाजत ही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते,शोभायात्रेत सहभागी झालेले सर्व भाविकांना महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते,अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने शोभायात्रा मिरवणुकीत पोलीस प्रशासन यांनी देखील उत्तम सहकार्य करुन,कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी निर्माण झाली नाही,या शोभायात्रेत म्हसळा शहरातील तसेच तालुक्यातील ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते,अगदी पारंपरिक पद्धतीने,व पारंपरिक वेषभूषा परिधान करून ही शोभायात्रा संपन्न झाली.तसेच धावीरदेव मंदिरात या शोभायात्रा मिरवणुकीची सांगता करण्यात आली.