म्हसळा श्री धाविर देव महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार. म्हसळा धावीरदेव महाराज यांना प्रथमच दिली जाणार शासकीय मानवंदना.

म्हसळा श्री धाविर देव महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार. म्हसळा धावीरदेव महाराज यांना प्रथमच दिली जाणार शासकीय मानवंदना.

म्हसळा श्री धाविर देव महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार.

म्हसळा धावीरदेव महाराज यांना प्रथमच दिली जाणार शासकीय मानवंदना.

म्हसळा श्री धाविर देव महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार. म्हसळा धावीरदेव महाराज यांना प्रथमच दिली जाणार शासकीय मानवंदना.

✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा : म्हसळाचे जागृत देवस्थान श्री धाविर देव महाराज मंदिराचे ग्रामस्थांनी काही वर्षा पूर्वी चैत्र शुध्द त्रयोदशीला जीर्णोद्धार सोहळा संपन्न केला होता. तेव्हा पासुन शहरात श्री धाविर देव महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
वाजत गाजत भाविक शोभा यात्रेत सहभागी होत ,श्री धाविर देव पालखीचे पुजन करून आशीर्वाद घेतले जाते,म्हसळयाचे श्री धाविर देव मंदिर पूर्वमुखी असून इतिहास कालीन नोंद आहे.रोजच धाविर देव मंदिरात महाराजांना सूर्यदर्शन होते.मंदिरात ग्रामस्थ, देव मानकरी यांचे शुभ हस्ते श्री धाविर देव,रवळनाथ,अवळनाथ,बापूजी,जोगेश्वरी,भैरी आणि काळेश्री देवतेचे चांदीचे मुखवटा तयार करून त्यांचे विधीवध प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात येतो. म्हसळा करांचे श्री धाविर देव महाराज हे जागृत देवस्थान असुन यातील काही देवतांचे देवस्थान शहरातील गवळवाडी,दुर्गवाडी,चिराठी गाव वस्तीच्या डोंगर कपारीत रमणीय ठिकाणी आहेत.म्हसळा येथे चैत्र पौर्णिमेला श्री धाविर देव महाराज यात्रेचे आयोजन करून या देवस्थानांना मानाने पालखीतून वतनदार,सालकारी,कुलकर्णी आणि ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने,भक्तीभावाने मूळ देवस्थानी श्री धाविर देव महाराज मंदिरात आणले जाते.म्हसळा येथील श्री धाविर देव मंदिर यात्रेच्या वेळी बळ काढण्याची प्रथा आज देखील कायम ठेवण्यात आली आहे, बळ काढणे म्हणजे म्हसळा शहराची वेस बांधणी करणे, कोणत्याही प्रकारची, नड, रोगराई, कोणत्याही प्रकारचे संकट आपल्या म्हसळा तालुक्यात, शहरातील सर्व समाज बांधवांना येऊ नये, सर्वांचे रक्षण करण्यासाठी धावीरदेव महाराज यांचे स्मरण करून गाव सिमा बांधण्यात येते, व तालुक्यातील काही गावामधून ग्रामस्थ मानाच्या काठ्या घेऊन येतात व हिंदू ग्रामस्थ मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येते,तसेच मानाची काठी समजली जाणारी म्हणजे केलटे या गावची ही मानाची काठी आल्यानंतर धावीरदेव महाराज यांची या काठीसोबत गळा भेट होते व त्यानंतर संपूर्ण म्हसळा शहरातील प्रत्येक घरोघरी धावीरदेव महाराज यांच्या दर्शनासाठी पालखी फिरविण्यात येते,व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा धावीरदेव महाराज मंदिरात आणली जाते,त्यामुळे आज देखील या प्रथेकडे मोठ्या श्रध्देने पाहिले जाते.तसेच रोहा, पोलादपूर आदि ठिकाणी धावीरदेव महाराज यांना शासकीय सलामी देण्यात येते यावेळी प्रथमच म्हसळा धावीरदेव महाराज यांना यात्रोत्सव वेळी पालखीला शासकीय मानवंदना देण्यात येणार असून ही गोष्ट म्हसळेकरांसाठी खूप अभिमानास्पद आहे. हा अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी यावेळी सर्व हिंदू ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील हिंदू ग्रामस्थ ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.