पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक मुंबई शहर यांनी गोंदिया पोलीस विभागाचे मानले आभार
प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
मो.9834486558.
गोंदिया :- सार्वत्रिक लोकसभा निवडणुक -२०२४ चे पहिल्या सत्रातील मतदान बंदोबस्तासाठी मुंबई शहर पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार हे गेल्या आठवड्या पासून तिरोडा, गोंदिया येथे आले होते.
मा. पोलीस अधिक्षक, गोंदिया व त्यांचे समुहाने अत्यंत नियोजनबद्ध बंदोबस्त लावल्याने गोंदिया जिल्ह्यातील मतदान शांततेत व सुरळीत पार पडले आहे.
या बंदोबस्त काळात मुंबई शहर, पुणे शहर व अन्य युनिट कडून आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांची निवास, भोजन व वाहतूक व्यवस्था ही अत्यंत योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. जिल्हा विशेष शाखेतर्फे रीटर्न जर्नीचे रेल्वे रीझर्वेशन सारखे महत्त्वाचे काम देखील वेळेत करून देण्यात आलेने एक महत्त्वाची चिंता कमी झाली हे विशेष..!
निवडणूक मतदान हा लोकशाहीचा आगळ्यावेगळा उत्सवच. हा लोकशाहीचा उत्सव गोंदिया जिल्ह्यात यशस्वीरीत्या व सुरळीतपणे साजरा होण्यासाठी श्री. निखिल पिंगळे, मा. पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली श्री. साहील झरकर, मा. पोलीस उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा व अन्य विविध पोलीस ठाणे व शाखेचे पोलिस अधिकारी व त्यांच्या पथकाने विशेष मेहनत घेतली हे सांगणे नकोच, पण श्री. देविदास कठाळे साहेब, पोलीस निरीक्षक, तिरोडा पोलीस स्टेशन व त्यांचा स्टाफ यांचा विशेष उल्लेख करुन आभार मानणे क्रमप्राप्त आहे. कारण त्यांनी सर्व मुंबई पोलीसांची अगदी कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे काळजी घेतली आहे हे येथे अभिमानाने सांगणे आवश्यक आहे.
असो, गोंदिया निवडणूक मतदान बंदोबस्त हा सुरळीतपणे पार पडला आहे. सदर बंदोबस्त हा एक टीम वर्कचा एक भाग असून, त्याला यशस्वी करण्यासाठी मुंबई पोलीसांनीही हातभार लावला आहे.
मुंबई परत जाताना गोंदियाच्या आठवणी घेऊन जात आहे. पुनश्च धन्यवाद गोंदिया पोलीस.