कुणबी समाज कोकण संघटना – टिटवाळा, या संघटनेचा सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम खुप उत्साहाने आणि खेळीमेळीच्या आनंदी वातावरणात संपन्न झाला
.
उल्हास पुराडकर, पनवेल तालुका प्रतिनिधी
७०२८०९८६४२
पनवेल, दिनांक – २१/०४/२०२४ रोजी वरील संघटनेच्या वतीने, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, लकी ड्रॉ (खेळ पैठणीचा), विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर असे उपक्रम शिवमंगल कार्यालय टिटवाळा येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर सन्मा. श्री. श्याम बापेरकर सर, सौ. संध्याताई श्याम बापेरकर (संस्थापक – सरस्वती शिक्षण संस्था व जॅक अँड जील प्री स्कूल), सन्मा. श्री. संजय गोंधळी साहेब (अध्यक्ष – शाखा संगमेश्वर), सन्मा.श्री. संजय पडये साहेब (सचिव – शाखा लांजा) सन्मा. श्री. प्रमोद नांदगांवकर साहेब (संस्थापक – रेड अँड स्वस्तिक सामाजिक संस्था – कल्याण, गंधर्व गुरुकुल संस्था – टिटवाळा, समाजसेवक), सन्मा. श्री. प्रसाद फर्डे सर (शिक्षक व समाजसेवक), सन्मा.ॲड. श्री. तुषार बिरवाडकर साहेब (संस्थापक – एकता फाउंडेशन रायगड, समाजसेवक) सन्मा. तृप्तीताई गायकवाड (महीला सक्षमिकरण) यांची उपस्थिती लाभली. संघटनेचे अध्यक्ष सन्मा. श्री. मोहनजी कणेरी साहेब व उपाध्यक्ष सन्मा. श्री. दत्ताराम म्हालिम साहेब यांच्या हस्ते श्री. गणेश पुजन करण्यात आले व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच जाणता राजा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महासम्राट श्री. बळीराजा, जगद्गुरु संत श्री. तुकाराम महाराज आणि समाजनेते श्री. श्यावरावजी पेजे साहेब या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली. संघटनेचे सचिव, श्री. नामदेव राजापकर यांनी सूत्रसंचालन करून, प्रमुख मान्यवर व उपस्थित सर्व समाज बांधवांचे स्वागत करुन संघटनेची प्रस्तावना मांडली. त्यानंतर प्रमुख मान्यवर यांना सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. संघटनेचे सह-सचिव श्री. मनोहर टेमकर सर यांनी पुढील सूत्रसंचालन करून विद्यार्थी गुणगौरव सोहळयाची सुरुवात केली. उपस्थित मुलांना सन्मानचिन्ह (ट्रॉफी) देऊन गौरविण्यात आले. संघटनेची महीला कार्यकारिणी सौ. मिनलताई कणेरी, सौ. सुशीलाताई म्हाके, सौ. प्रियांकाताई चौगुले, सौ. अमिषा ताई शिगवण, सौ. मनस्वीताई टेमकर यांनी महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला. प्रमुख मान्यवर सन्मा. श्री. श्याम बापेरकर सर, सन्मा. सौ. संध्याताई बापेरकर, सन्मा. श्री. प्रसाद फर्डे सर, सन्मा. श्री. प्रमोद नांदगांवकर साहेब यां सर्वांनी मुलांना खुप छान पद्धतीने मार्गदर्शन केले. सन्मा.तृप्तीताई गायकवाड यांनी महिला सक्षमीकरना बद्दल छान माहिती सांगितली. तसेच श्री. संजय गोंधळी साहेब, श्री. संदीप पडये साहेब, ॲड. श्री. तुषार बिरवाडकर साहेब यांनीही खुप छान विचार मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी महिलासाठी लकी ड्रॉ कार्यक्रम घेण्यात आला, तीन भाग्यवान विजेत्या महिलांना पैठणी साडी बक्षिस रुपात देण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर, समाज बांधव आणि सर्व देणगीदार यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता कऱण्यात आली.
विद्यार्थी गुणगौरव सोहळा व प्रमुख मान्यवर यांचा सन्मान करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष सन्मा. श्री. मोहन कणेरी साहेब यांच्याकडुन सन्मान चिन्ह (ट्रॉफी) देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री. मोहन कणेरी साहेब, उपाध्यक्ष श्री. दत्ताराम म्हालीम साहेब, कार्याध्यक्ष श्री. प्रदिप घाणेकर साहेब, सचिव श्री. नामदेव राजापकर साहेब, खजिनदार श्री. विशाल पातेरे सर, सह-सचिव श्री. मनोहर टेमकर सर, सह खजिनदार श्री. योगेश टोले साहेब, प्रमुख सल्लागार श्री. विजय बैकर साहेब, श्री. मयुर म्हाके साहेब, सम्पर्क प्रमुख – श्री. अरविंद शिगवण साहेब, श्री. अभिषेक नवलू साहेब, श्री. प्रवीण टोले साहेब, सदस्य – श्री. विलास लोखंडे साहेब, श्री. प्रकाश चौगुले साहेब यां सर्वांनी खुप मेहनत घेतली. संघटनेच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.