वंचित बहुजन आघाडी तर्फे नाशिक लोकसभेसाठी करण गायकर तर दिंडोरी लोकसभेसाठी मालती शंकर थविल यांना उमेदवारी जाहीर

ज्ञानेश्वर तुपसुंदर
नाशिक तालुका प्रतिनिधी
मो.८६६८४१३९४६

नाशिक : वंचित बहुजन आघाडीतर्फे नाशिक लोकसभा मतदारसंघात सकल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात मालती शंकर थविल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत आज वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद संपन्न झाली, यावेळी करण गायकर आणि मालती थविल यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश झाला, यावेळी दोन्ही उमेदवारांना लोकसभेची उमेदवारी वंचितच्यावतीने देण्यात आली, यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, शहराध्यक्ष अविनाश शिंदे, वामनराव गायकवाड, शरद सोनवणे, अनिल आठवले आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना मैदानात उतरवले आहे. तर महायुतीच्या उमेदवारीचा घोळ कायम आहे. मविआ नंतर वंचितनेही मराठा समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली आहे, तसेच शांतिगिरी महाराज हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहेत.

तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने डॉ. भारती पवार, महाविकास आघाडीच्या वतीने भास्कर भगरे, आणि वंचितच्यावतीने मालती थविल हे उमेदवार निश्चित झाले आहेत, तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जे. पी. गावित यांच्यासह भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे सुद्धा निवडणूक लढवणारच्या तयारीत आहे त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे.