कोल्हारे ग्रामपंचायत मधील तीन रस्त्यांच्या कामांबाबत ठेकेदार उदासीन…
मुदत संपली तरी कामे अर्धवटच?
✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞९०१११९९३३३
नेरळ :- नेरळ संकुल विकास प्राधिकरण कडून कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत तीन रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली होती.या रस्त्यांची कामे करण्यासाठी कामाचे कार्यादेश रायगड जिल्हा परिषद कडून ऑगस्ट २०२३ मध्ये देण्यात आले होते.मात्र मुदत संपली तरी ती सर्व कामे अर्धवट आहेत.दरम्यान, नेरळ संकुल विकास प्राधिकरण कडून संबंधित ठेकेदार यांना पत्र देवून सूचित करण्यात आल्या नंतर देखील ठेकेदार कोणत्याही प्रकारे कामे सुरू करून पूर्ण करीत नाही.त्यामुळे रस्त्याची कामे मिळविणाऱ्या ठेकेदारावर जिल्हा परिषदेने कारवाई करावी आणि नवीन ठेकेदाराला ती कामे देण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी केली आहे.
कोल्हारे ग्रामपंचायत मध्ये नेरळ बोपेले रस्त्यापासून हजारे नगर रस्ता तयार करण्यासाठी २३ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता.तर सिद्धिविनायक अपार्टमेंट ते कृष्णा पार्क या रस्त्याचे डांबरीकरण करणे कामासाठी १८ लाखाचा निधी मंजूर आहे.तसेच बोपेले नेरळ कळंब रस्ता ते अनश रेसिडेन्सी येथील रस्त्याचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्याचे कामासाठी नेरळ विकास प्राधिकरण कडून १७.९५ लाख निधी मंजूर आहे.या तिन्ही विकास कामांचे ठेका फायरविन इन्फ्राकोन सर्व्हिसेस या कंपनीने मिळविले आहेत.तिन्ही विकास कामांचे कामे सुरू करण्याचे कार्यादेश ऑगस्ट २०२३ मध्ये रायगड जिल्हा परिषदेचं नेरळ विकास प्राधिकरण कडून देण्यात आल्या आहेत.य रस्त्यांच्या कामांमध्ये मार्च २०२४ पूर्वी बोपेले भागातील तिन्ही रस्त्याची कामे होऊन तेथील रहिवाशी यांना पक्क्या रस्त्याने ये जा करता आली असती.
मात्र ही सर्व विकास कामे पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता.फेब्रुवारी २०२४ मध्ये रस्त्याची कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना आज एप्रिल २०२४ मध्ये देखील रस्त्यांच्या कामासाठी केवळ सिमेंट पाईप आणून टाकण्यात आले आहेत. त्याशिवाय अन्य कोणतीही कामे ठेकेदाराने पूर्ण केली नाहीत.त्यामुळे नेरळ विकास प्राधिकरण कडून ठेकेदार फायरविन इन्फ्राकोन सर्व्हिसेस या कंपनील मार्च २०२४ रोजी नोटिसा पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. ठेकेदाराल पाठवलेल्या नोटीस मध्ये रस्त्याचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा असताना अद्याप जेमतेम कामे पूर्ण झाली आहेत. असे या पत्रात नमूद करण्यात आले असून नेरळ विकास प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकारी यांच्याकडून ते पत्र देण्यात आली आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत चे सदस्य विजय हजारे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. हजारे नगर भागात केवळ रस्ता खोदून ठेवला असल्याने स्थानिक रहिवाशी यांना चालताही येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या नेरळ प्राधिकरण कडून तो रस्ता तत्काळ सुरळीत करून द्यावा अशी मागणी केली आहे. प्राधिकरण ने रस्ता खोदणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी देखील मागणी केली आहे. त्याचवेळी प्राधिकरणने त्या भागातील रहिवाशांची गैरसोय आठ दिवसात दूर केली नाही तर मात्र आपण स्वतः नवव्या दिवशी रस्त्याचं सपाटीकरण करून रस्ता सुस्थितीत करणार असा इशारा विजय हजारे यांनी दिला आहे.