म्हसळा ग्रामदैवत धावीरदेव महाराज यात्रोत्सव व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा रायगड पोलीस दलाकडून देण्यात आली पालखीला शासकीय मानवंदना. ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती.

म्हसळा ग्रामदैवत धावीरदेव महाराज यात्रोत्सव व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा रायगड पोलीस दलाकडून देण्यात आली पालखीला शासकीय मानवंदना. ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती.

म्हसळा ग्रामदैवत धावीरदेव महाराज यात्रोत्सव व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

रायगड पोलीस दलाकडून देण्यात आली पालखीला शासकीय मानवंदना.

ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती.

म्हसळा ग्रामदैवत धावीरदेव महाराज यात्रोत्सव व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा रायगड पोलीस दलाकडून देण्यात आली पालखीला शासकीय मानवंदना. ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती.

✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा: चैत्र पोर्णिमेच्या दिवशी म्हसळा ग्रामदैवत श्री धावीरदेव महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांनी व रोषणाईने सजविण्यात येते, हिंदू ग्रामस्थ ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी तसेच पुजेचे मानकरी यांच्या हस्ते श्री श्री धावीरदेव महाराज, रवळनाथ, अवळनाथ, बापुजी, जोगेश्वरी, भैरी,काळेश्री या देवतांना विधिवत चांदीचे मुखवटे परिधान करून, पालखी सजवून त्या पालखी मध्ये या सर्व देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, श्री धावीरदेव महाराज हे संपूर्ण म्हसळेकरांचे ग्रामदैवत असुन या सर्वांचे रक्षण करतो, आणि म्हसळेकर मोठ्या श्रध्देने व भक्तिभावाने धावीरदेव महाराज यांची पुजा अर्चा करतात व ग्रामदैवतेला साकडे घालतात, या वेळी मुंबई, पुणे, ईतर ठिकाणी कामानिमित्ताने गेलेले ग्रामस्थ या वेळी आवर्जून उपस्थित राहून श्री धावीरदेव महाराज यांचे दर्शन घेताना दिसतात व यात्रेत आणि पालखी मिरवणुकीत सहभागी होतात, यात्रोत्सव मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने थाटण्यात आली होती, मिठाई, खेळणी, ज्वेलरी, खाद्य पदार्थ, तोरण, या मुळे खरेदीसाठी अनेक जण येऊन खरेदी करताना दिसत होते, या यात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील अनेक गावामधून येणाऱ्या काठ्या, तालुक्यातून खारगाव बु, खारगाव खु, पेढांबे,खरसई,आगरवाडा,दुर्गवाडी,म्हसळा आदिवासी वाडी,सावर,चिरगाव,ढोरजे,चिचोंडे,पाभरे,निगडी, कांदळवाडा या गावातील काठ्या वाजत गाजत येऊन यात्रेत सहभागी होऊन धावीरदेव महाराज यांच्या भेटीसाठी येतात व येणाऱ्या काठ्यांचे म्हसळा हिंदू ग्रामस्थ ट्रस्ट यांच्या वतीने स्वागत करुन श्री धावीरदेव महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली,
यंदा या शोभायात्रा व पालखी मिरवणूक मध्ये सर्वाच्या साठी आनंदाचा व ऐतिहासिक क्षण म्हणजे या वेळी रायगड पोलीस दलाकडून प्रथमच म्हसळा श्री धावीरदेव महाराज यांच्या पालखीला शासकीय मानवंदना देण्यात आली आणि हा ऐतिहासिक क्षण बघण्यासाठी म्हसळा तालुक्यातील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हा क्षण बघता आला, न भुतो न भविष्याता असा क्षण पाहून सर्व जण आनंदीत होऊन हर हर महादेव… धावीरदेव महाराज की जय या जयघोषात परिसर दुमदुमून निघाला, या पालखी सोहळ्यात व मानवंदना देते वेळी ज्यांच्या प्रयत्नाने हा ऐतिहासिक क्षण अनुभवता आला ते म्हणजे खासदार सुनील तटकरे हे उपस्थित राहून पालखीचे पुजन करून दर्शन घेण्यात आले तसेच हिंदू ग्रामस्थ ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकुमार गोविलकर, सचिव सुशील यादव व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते खासदार सुनील तटकरे यांचे शाल, श्रीफळ व श्री धावीरदेव महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी बोलताना सुनील तटकरे यांनी सांगितले की पालखी सोहळ्यात सहभागी होत असताना मला अतिशय आनंद होत आहे आणि मी धावीर भक्त म्हणून उपस्थित राहिलो आहे,या पालखीला शासकीय मानवंदना देण्यात यावी म्हणून म्हसळा हिंदू ग्रामस्थ मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकुमार गोविलकर व सचिव सुशील यादव तसेच सर्व पदाधिकारी यांच्या वतीने मला निवेदन देऊन सांगण्यात आले की म्हसळा धावीरदेव महाराज पालखीला शासकीय मानवंदनासाठी मान्यता मिळावी, त्या पध्दतीने मी प्रयत्न करुन ते यशस्वी झाले या मुळे मला अधिक आनंद होत आहे. पालखी सोहळा हा प्रत्येकाच्या आनंदाचा क्षण असतो आणि तो आपल्याला अनुभवता आला आहे, तसेच पालखी मानवंदना ही निरंतर सुरू राहणार याची तुम्हाला ग्वाही देतो. तसेच आपण मला बोलवून श्री धावीरदेव महाराज यांच्या चरणी नतमस्तक ठेवता आले,तसेच हिंदू ग्रामस्थ मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने माझे स्वागत करुन श्री धावीरदेव महाराज यांची प्रतिमा भेट दिलीत त्याबद्दल मी हिंदू ग्रामस्थ ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गोविलकर व सचिव सुशील यादव तसेच पदाधिकारी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मंडळाचे सचिव सुशील यादव यांनी खासदार सुनील तटकरे यांचे विषेश आभार मानले कारण खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नाने आम्हाला हा ऐतिहासिक क्षण अनुभवता आला आहे आणि या क्षणाची शासकीय दप्तरी नोंद होणार असून या पुढे पालखीला शासकीय मानवंदना देण्यात येणार असुन खरच आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. खासदार साहेब यांच्या कडे खरच जादुची कांडी आहे कारण काही दिवसातच यासाठी मान्यता मिळाली आहे याची प्रक्रिया गृहमंत्रालयातुन होते या साठी म्हसळा हिंदू ग्रामस्थ ट्रस्ट मंडळ यांच्या वतीने आपले खूप धन्यवाद.म्हसळा सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही शासकीय मानवंदना देण्यात आली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार गोविलकर, सचिव सुशील यादव, सुनील उमरठकर, नगराध्यक्ष संजय कर्णिक,महादेव पाटील,गणेश हेगिष्ट्ये, दादा पानसरे, अमर करंबे, विशाल साळुंखे, गणेश म्हशिलकर, भाई बोरकर, सुरेश कुडेकर, सुनील अंजार्लेकर, योगेश करडे, भालचंद्र करडे, भालचंद्र दातार, राहुल पोतदार, दिपल शिर्के, अनिकेत पानसरे, राजु बोरकर, बाबु शिर्के, प्रकाश करडे,अशोक काते, मंगेश म्हशिलकर, गणेश म्हशिलकर, समिर बनकर, मुकुंद बोर्ले, स्वप्निल चांदोरकर, बंटी म्हशिलकर,दत्तात्रेय उध्दरकर,सौरभ गोरेगावकर, संदीप गव्हाणे, प्रसन्न निजामपुरकर. तसेच सर्व हिंदू ग्रामस्थ व महिला वर्ग हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.