नेरळ-कायदा-सुव्यवस्थेसाठी आम्ही सज्ज; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च
✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞९०१११९९३३३
नेरळ ;- नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे व bsf बंदूक धारी बटालियन यांच्या वतीने दिनांक २७ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी नेरळ शहरातील गणेश घाट – माऊली मेडिकल – अंबिका नाका – शिवाजी चौक – नेरळ रेल्वे स्टेशन – खांडा – फॉरेस्ट नाका – नेरळ पोलीस स्टेशन रूट मार्च काढण्यात आला.
आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस दल बि.इस.एफ. दल सज्ज आहे, असा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला.
सदर रूट मार्च साठी नेरळ पोलीस ठाणे यांचे ०४ अधिकारी, २२ अंमलदार व B.S.F. प्लाटून चे ०२ अधिकारी ४६ जवान होते.