येरगाव शाळेतील विद्यार्थी वार्षिक परिक्षेपासून वंचित
परिक्षाच नाही तर पुढील शिक्षणासाठी जबाबदार कोण?
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार कोणत्याही बालकाला शिक्षणापासून व परिक्षा पासून वंचित ठेवणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो.
अमान क़ुरैशी प्रतिनिधि तालुका सिंदेवाही
8275553131
सिंदेवाही :- पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगाव येथील विद्यार्थी शिक्षिकेच्या कटकारस्थानामुळे गटशिक्षणाधिकारी यांच्या वेळकाढूपणा व बघ्याच्या भुमिकेमुळे परीक्षेपासून वंचित राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्राचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली असून, यास जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
८६ व्या विशोधन अधिनियमान्वये
अनुच्छेद २१अ नुसार बालकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षा करणं बंधनकारक असताना किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कोणतीही कारवाई वरिष्ठांनी दखल घेऊन केली नाही. त्यांच्या विषयी गंभीर तक्रारीची वरिष्ठ दखल न घेण्याचं कारण गुलदस्त्यातच आहे.
शिक्षिका यांच्यावर बाल हक्क संरक्षण अधिकार अधिनियम 2015 कलम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर व विद्यार्थीनी व शालेय पोषण आहार मदतनीस यांच्याशी मानवी हक्कांची पायमल्ली करून वागणूक दिल्याची तक्रार करूनही न्याय मिळाला नाही.
किशोर पिसे यांनी जर शिक्षिकेचा आदेश राजकीय दबावातून तोंडी सुचनेनुसार बदली आदेश रद्द केला नसता तर गावातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहून अधिकांश विद्यार्थी वार्षिक परीक्षेपासून मुकले नसते.
आज येरगाव येथील शाळेत ४३ विद्यार्थी असून ८-९ विद्यार्थी यांनीच वार्षिक परीक्षा दिली आहे.अजूनही शाळेला प्रभारासह मुख्याध्यापक/शिक्षक नाही. त्यामुळे किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी कुलूप तोडून प्रभार देतात का? की कुणाचं संरक्षण करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार शाळा व्यवस्थापन समिती अस्तित्वात आहे.समिती पदाधिकारी यांना अधिनियमानुसार आपली कर्तव्ये पार पाडणे बंधनकारक करण्यात आली आहे.
नियमबाह्य पद्धतीने निवडलेल्या अध्यक्ष यांच्या उपस्थितीत शालेय कपाट फोडून प्रभार देणे, तक्रार दाखल केल्यानंतर दखल न घेतल्याने,लबाडीने गैरप्रकार करण्यासाठी किशोर पिसे यांनी अधिकाराचा गैरवापर करून, आदर्श शाळेची प्रतिमा मलिन केली आहे.
येरगाव शाळेत संगिता कुंभारे शिक्षिकेने जाणीवपूर्वक शुल्लक कारणासाठी केलेली मानवी हक्कांची पायमल्ली व अक्ट्रासिटी अक्ट विविध कलमांचे उल्लंघन करुनही ,गंभीर स्वरूपाची बाब असताना किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी यांनी सुरुवातीला दुर्लक्ष करून प्रकरण वाढविण्यासाठी,स्वतःच्या स्वार्थासाठी अधिकाराचा गैरवापर करून,विद्यार्थ्यांचं कधीही भरून न निघणार शैक्षणिक नुकसान केल्यानं किशोर पिसे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समिती येरगाव अध्यक्ष सुभाषचंद्र महादेव विजकापे यांनी केली आहे.