डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात नीट युजी परीक्षा संपन्न.
✍️ नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 8983248048 📞
माणगाव : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नवी दिल्ली तर्फे नीट युजी २०२४ ची परीक्षा घेण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे याची निवड केली होती. ही परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. कारभारी काळे आणि कुलसचिव प्राध्यापक डॉ. अरविंद किवळेकर, पदविका विभागाचे प्राचार्य डॉ. दाभाडे, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. नलबलवार,वित्त अधिकारी श्री. अंबपकर,प्रा. पुलचवाड,श्री. अनिल गोरेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा अतिशय व्यवस्थितरित्या पार पडली. ५ मे रोजी विद्यापीठात या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून सुमारे बाराशे चौविस विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते या यशस्वीतेसाठी विद्यापीठ प्रशासन आणि विद्यापीठ सुरक्षा यंत्रणा यांच्या अथक प्रयत्नांनी नीट युजीची परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या संपन्न झाली.