तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू • गोंडपिपरी येथील घटना

तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू • गोंडपिपरी येथील घटना

तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

• गोंडपिपरी येथील घटना

तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू • गोंडपिपरी येथील घटना

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

गोंडपिपरी : 8 मे
येथील न्यायालयाच्या मागे असलेल्या तलावात मित्रांसोबत आंघोळीला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 7 मे रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. बुधवार, 8 मे रोजी सकाळी दोन्ही मुलांचे मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले.
गौरव विलास ठाकूर (14), शौर्य भास्कर पिंपळशेंडे (15) अशी मृतकांची नावे असून, दोघेही शहरातील शिवाजी चौकातील रहिवासी आहेत.
मंगळवारी 12 वाजताच्या सुमारास शिवाजी वॉर्डातील काही मुले फिरायसाठी गेले. न्यायालयालगत असलेल्या परसबोडी तलावात त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. चिमुकले पोहण्यासाठी तलावात गेले. काही वेळाने तेथील काही मुले घरी परतली. तर बर्‍याच वेळेपर्यंत गौरव व शोर्य हे घरी परतलेच नाही. आई-वडिलांनी सायंकाळी त्यांचा शोध घेतला. पण ते कुठेच दिसले नाही. तलावाजवळ पाहणी केली असता, त्यांच्या मुलांचे कपडे आढळून आले. दरम्यान, भितीपोटी इतर मुलांनीही याबाबतची माहिती कुणालाही दिली नाही. लगेच पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पण, रात्र झाल्याने शोधमोहिम राबवता आली नाही. बुधवारी सकाळपासून शोधाशोध सुरू केली असता, त्यांचे मृतदेह हाती लागले. पोलिसांनी रात्रभर तलावाजवळ पहारा दिला. चिमुकल्यांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांनी भेट दिली. या घटनेने शहरात शोककळा पसरली आहे.