हिंगणघाट साई मंदिर येथे श्रीराम चारित्रमानस कथा सप्ताह चा कार्यक्रम उत्साहित पार पडला.


मुकेश चौधरी

हिंगणघाट :- दर वर्षी प्रमाणे याही वर्षी राजयोगी माताजी यांच्या २२ व्या पुण्यतिथी चे औचित्य साधून श्री साई मंदिर हॉल नंदोरी रोड हिंगणघाट येथे श्रीराम चरित्रमानस कथा भागवत चा कार्यक्रम पार पडला.
दर वर्षी येथे भागवत कथेचा कार्यक्रम साई मंदिर परिसरात होत असते परंतु या वर्षी श्रीराम चरित्रमानस कथा देवी वैभवीश्रीजी यांनी भागवत कथा सादर केली होती. या श्रीराम कथेत प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, भरत, हनुमान याची झाखी आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली. खास करून रामकथा ही नेहमी हिंदी भाषे मध्ये असते परंतु हिंगणघाट मध्ये साई मंदिर येथे प्रथमच श्रीराम चरित्रमानस कथा मराठी मध्ये एकवण्यात आली. हा सप्ताह १० जानेवारी ते १६ जानेवारी १ आठवडा होता त्यानंतर १७ जानेवारीला भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला होता या महाप्रसदाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला तसेही दर गुरवारला साई मंदिर मध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम नेहमी राबविण्यात येते या कार्यक्रमात लाबून लाबून लोक येत असतात तसेच दर वर्षी हा कार्यक्रम डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात होत असते.

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती शास्त्री महाराज, उद्योजक लताताई मोहता, डॉ.विजय पर्बत, उद्योजक शंकरराव गुल्हाने, महेशजी गुल्हाणे यांची उपस्थिती प्रार्थनीय ठरली यांचे स्वागत साई ट्रस्टी च्या सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले
तसेच साई मंदिर चे अध्यक्ष संत योगेश्वर महाराज व सचिव अतुल वांदीले यांचे सुद्धा स्वागत शाल व श्रीफळ देऊन करण्यात आलेयाप्रसंगी साई मंदिरच्या सर्व सदस्यांनी या कार्यक्रमात भरपूर योगदान दिले या कार्यक्रम सनिटायझर व मास्क चा वापर करण्यात आला हजारो च्या संख्येने कार्यक्रमात लोक सहभागी झाले होते.

याप्रसंगी साई मंदिर अध्यक्ष संत योगेश्वर महाराज (दादा) सचिव अतुल वांदीले, सदस्य भाऊरावजी कोटकर, चंद्रशेखर नीमट सर, निलेश निखाडे, राहुल बालपांडे, अशोक रेवतकर, श्री गिरी सर, श्री किशोर शेगोकर सर, श्री अविनाश बुरीले सर, सुरेश दविले सर, संजय हावगे, भाऊराव गोल्हर, हरीश खियानी, लालूसेठ जेस्वानी, सारंग गुळघाने, झोडे सर, किसन गुळघाने, राजू सिन्हा, अमोल बोरकर, डॉ शरद विहिरकर, लक्ष्मण सावरकर, बंडूपत नेरुळवर, जनार्दन गोटे, अशोक झोडे, प्रा.शरद कुकडे, रमेश गोहाडे, सुभाष खडसे, विजय राडे,प्रदीप चव्हण, विजय साठे, सुधाकर वाढई, आधी सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here