जिल्ह्यात अय्यान अजानीने मारली बाजी, तर रिया खंदारे गुणवंत यादीत
• सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 13 मे
सीबीएसई इयत्ता दहावीच्या परिक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, नारायणा विद्यालयाचा विद्यार्थी अय्यान अजानी यांनी 98.80 टक्के, तर श्री महर्षी विद्या मंदिरची विद्यार्थिनी रिया खंदारे हिने 97 टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यातील गुणवंत म्हणून नाव लौकिक केले आहे.
2023-2024 या शैक्षणिक सत्रात घेण्यात आलेल्या सीबीएसई परिक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. श्री महर्षी विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम राखली. या परिक्षेसाठी 83 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 13 विद्यार्थ्यांनी 90 टक्केहून अधिक गुण प्राप्त केले. त्यात रिया खंदारे 97 टक्के, ज्ञानदिप अडवे 96.6, अद्वैत पाडेवार यांनी 96 टक्के गुण प्राप्त करून विद्यालयात अव्वल स्थान प्राप्त केले. आर्यन गवळे 94.6 टक्के, हंसिता चुुदरी 94.2, शर्विन परचाके 93.8 टक्के, उद्धव नल्लुरी 92.8 टक्के, खुशांत बनकर 92.6 टक्के, वेदांत खाडे 92.4 टक्के, सिद्धी गड्डमवार 92.4, अनमोल दुधनकर 91.6 टक्के, सृष्टी प्रतापवार 91.2 टक्के तर उदय पिंपळकर याने 91 टक्के गुण प्राप्त केले. हंसिता चुदरीला इंग्रजीत 99 गुण मिळाले. तर रिया खंदारे हिला हिंदीत 99, तर सोशल स्टडीजमध्ये 98 टक्के गुण मिळाले आहेत. अद्वैत पाडेवारने गणित विषयात 99 गुण प्राप्त केले. ज्ञानदिप अडवे याने विज्ञान शाखेत 99 गुण प्राप्त केले.
या यशाबद्दल गुरूकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक, उपाध्यक्ष वसुधा कंचर्लावार, सचिव दत्तात्रय कंचर्लावार, कोषाध्यक्ष अनुपम चिलके, सदस्य अल्का चांडक, उमेश चांडक, विरेंद्र जैस्वाल, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीलक्ष्मी मूर्ती, उप मुख्याध्यापिका निशा मेहता यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.