रायगडमध्ये अवकाळी पाऊस
आंबा काजु बागायतदार धास्तावला मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता
✍️संतोष उद्धरकर.✍️
म्हसळा तालुका प्रातिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा: १३ मे रोजी रायगडमध्ये अनेक ठिकाणी दुपारच्या नंतर अचानक वातावरणात बदल होऊन वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. महाड, पोलादपुर, गोरेगाव, रोहा, माणगाव आदी ठिकाणी अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.तसेच म्हसळ्या मध्ये देखील तुरळक स्वरुपाचा पाऊस पडल्याने उकाडयाने हैराण झालेल्या नागरीकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने थोडासा दिलासा वाटत असला तरी आंबा काजु बागायतदार मात्र धास्तावले आहेत, जरी काही प्रमाणात आंबा उतरविला असला तरी अध्याप मोठ्या प्रमाणात आंबा काजु उतरविणे बाकी असल्याने काही आंबा विक्रेते व बागायतदार मात्र चिंतेत पडले आहेत.
………………………………
खुप मेहनत घ्यावी लागते आंबा लागवडीसाठी. यंदा चांगल्या प्रकारे आंबा लागला होता पण या अचानक आलेल्या वारा आणि पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
बागायतदार.